सामाजिक

मुखेड तालुक्यात वसूर येथे विज पडून ६५ वर्ष वृद्ध महिलेचा मृत्यू 

मुखेड प्रतिनिधी :- १४ मे 

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे अस्मानी संकट ओढावले आहेपुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा हवामान विभागाने दिलायगत दोन दिवसांपासून मुखेड तालुक्यात विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे.

मुखेड शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला.

दि १४ मे रोजी मुखेड तालुक्यातील वसुर येथे  सायंकाळी अंदाजे ५.३० वाजता शेषाबाई कामिन शिंदे अंदाजे वय 65 वर्ष ,यांचा शेतामध्ये काम करत असताना विज पडून मृत्यू झाली.

तर  मौजे चांडोळा येथील शेतकरी व्यंकट गणपती तमशेट्टी याच्या म्हैसवर वीज पडून मृत्यू झाला

व तसेच मुखेड शहरातील समता नगर येथे सतीश विठ्ठलराव गायकवाड यांचे राहते घरावर वीज कोसळून त्यांच्या घरातील वायरिंग व विद्युत उपकरणे जळाले असून त्यात कसल्याच प्रकारची जीवित हानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती,मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव व तलाठी सतीश देशमुख यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button