क्राईम

शासकीय रुग्णालयात पोलिसां देखत तरुणाचा खून; दोन पोलीस निलंबित

नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०९ एप्रिल २६

शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक थरारक घटना  एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयात घडलीपूर्व वैमनस्यातून एका तरुणाची पोलिसांच्या डोळ्यां देखत हत्या करण्यात आली असूनया प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची गाजपडली आहे.

शहरातील स्क्वेअर परिसरात झालेल्या एका वादात सय्यद आवेज (२७) आणि मोहम्मद अरबाज हेदोघे गंभीर जखमी झाले होतेपोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलेमात्रआरोपीचा पाठलाग थांबला नव्हताआपल्या भावाच्या (अरिजीतसिंगखुनाचा बदला घेण्याच्या ईर्ष्येने पेटलेला राजेश चव्हाण हा हातात तीक्ष्ण शस्त्र घेऊन थेट रुग्णालयात घुसला.

रुग्णालयातील अपघात विभागाबाहेर पोलीस तैनात असतानाहीआरोपीने संतापच्या भरात सय्यद आवेजवर सपासप वार केलेया भीषण हल्ल्यात आवेजचा जागीच मृत्यू झालाशासकीय रुग्णालया सारख्या गजबजलेल्या आणि संवेदनशील ठिकाणी पोलिसांच्या उपस्थितीतच ही हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाईचे पाऊल उचलले आहेघटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

या घटनेमुळे नांदेडमधील कायदा  सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असूनरुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button