क्राईम

महसूल प्रशासनाच्या नाकाखाली रेती माफियांचा नंगानाच; तक्रारीनंतरही मुखेड तहसील समोरून अवैध वाहतूक सुरूच!

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ५ मे २६ 

मुजोर रेती माफियांनी मुखेड महसूल प्रशासनाला जणू काही गृहीतच धरले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेरात्रीच्या वेळी चक्क मुखेड तहसील कार्यालया समोरून क्षमतेपेक्षा जास्त(ओव्हरलोडअवैध रेतीची वाहतूक राजरोसपणे सुरू आहेधक्कादायक बाब म्हणजेयापूर्वी अनेक तक्रारी होऊन आणि बातम्या प्रकाशित होऊनही या प्रकाराला आळा बसलेला नाहीत्यामुळे आता नूतन तहसीलदार विकास हे या माफियांच्या मुसक्या आवळून आपला दरारा निर्माण करणार कायाकडेसंपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

तहसील कार्यालय ही तालुक्याची सर्वोच्च प्रशासकीय इमारत आहेया इमारतीच्या समोरूनच रात्रीच्या शांततेत ओव्हरलोड ट्रक आणि हायवा धावत असल्याने माफियांचे धाडस किती वाढले आहेहे स्पष्ट होतेसातत्याने बातम्या प्रसिद्ध होऊनही जर हे प्रकार थांबत नसतीलतर यामागे नेमके कोणाचेवरदहस्त‘ आहेतअसा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

नूतन तहसीलदार विकास हे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहेत्यांच्या कार्यक्षमतेबद्दल तालुक्यातचर्चा असली तरीरेती माफियांचे हे ‘ओपन चॅलेंज‘ त्यांच्यासमोर मोठे आव्हान ठरत आहेकागदोपत्री कारवाया करण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून या अवैध वाहतुकीचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

यापूर्वी अनेक प्रसारमाध्यमांनी या अवैध वाहतुकीचे वाभाडे काढले आहेतमात्रतरीही रात्रीच्या वेळी हीअवैध वाहतूक सुरूच असणेहे महसूल विभागाच्या भरारी पथकाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेमाफियांच्या या मुजोरीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत असून अपघातांचा धोकाही वाढलाआहे.

तहसील कार्यालयाच्या दारातून अवैध रेतीचे ट्रक जातातच कसे? हा मुखेडकरांसाठी चिंतेचा विषय आहे. नवीन तहसीलदार विकास हे यांनी आता कठोर पावले उचलून या माफियांची दादागिरी मोडीत काढावी, हीच अपेक्षा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button