क्रीडा

विद्यार्थ्यांमध्ये मैदानी व सांघिक खेळाची गोडी लागावी म्हणून डॉ.श्रीहरी बुडगेमवार यांनी शाळेला दिले क्रिडा साहित्य भेट

मुखेड /प्रतिनिधी:-

मुखेड येथील सुप्रसिद्ध आध्या डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक तथा वैद्यकिय संस्थेचे सचिव डॉ.श्रीहरी राजाराम बुडगेमवार यांनी श्री संत मन्मथ स्वामी माध्यमिक विद्यालयास क्रिडा साहित्य भेट देऊन विद्यार्थ्यांत आंनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थी मोबाईल व टीव्ही पहाण्यात अडकला आहे.
देशी ,मैदानी ,गावठी खेळ मुले खेळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रतिकार शक्ती व शारीरिक क्षमता कमी झाल्या आहेत. बालवयात पालक मुलांना मोबाईल देतात पण त्याचे दुष्परिणाम काय? हे माञ विचार करत नाहीत.म्हणून टेन्शन येणे, ताणतणाव वाढणे, चिडचिड पणा वाढणे,कोणी बोलले तर सहण न होणे,डोळ्याचे व कानाचे आजार वाढले आहेत.तर काही मुले टोकाची भुमिका घेत आत्महत्या करत आहेत.
या विद्यार्थ्यांमध्ये मैदानी व सांघिक खेळाची गोडी लागावी.त्याचे मनोबल वाढावे, नेञत्व गुणाला वाव मिळावी म्हणून एक सामाजिक उपक्रम राबवत डॉ.श्रीहरी बुडगेमवार यांनी तालुक्यातील सांगवी बे. सारख्या ग्रामीण भागात असलेल्या श्री संत मन्मथ स्वामी माध्यमिक विद्यालयाच्या टिमने पावसाळी क्रिडा स्पर्धेत व्हाॅलिबाॅल खेळात विभाग पातळी पर्यंत मजल मारली या मुळे डॉ.श्रीहरी बुडगेमवार यांनी शाळेस व्हाॅलिबाॅल,नेट भेट देऊन सर्व खेळाडु विद्यार्थांचा गौरव केला.
यावेळी ग्रामीण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .हरिदास राठोड, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद आडकिने, डॉ.श्रीहरी बुडगेमवार, संचालक शंकरराव होनशेट्टे, शाळा व्यावस्थापण समितीचे अध्यक्ष बालाजी होणशेट्टे, शासकिय गुत्तेदार मनोज कांबळे ,सरपंच प्रतिनिधी मिलिंद जोंधळे,चेरमण विजयकुमार मस्कले, मुख्याध्यापक एम.आर.मोमिण
आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button