Uncategorized

तांदळाच्या ६२० गोण्या घेऊन जाणारा ट्रक फुलवळ टोलनाक्याजवळ उलटला 

कंधार प्रतिनिधी:- १३ सप्टेंबर 

नांदेडबिदर राष्ट्रीय महामार्गावरील फुलवळ टोलनाक्याजवळ (ता कंधार ) रस्त्यावर तांदूळ घेऊनजाणारा ट्रक उलटलाही घटना शुक्रवारी(दि.१२सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडलीटोलनाक्याजवळ पलटी होऊन तांदळाचे भरलेले पोते अस्ताव्यस्त पडल्यामुळे सदरचा माल हा काळ्याबाजारात चालला होता की काय ? असा प्रश्न उपस्थित करून परिसरात चर्चेला उधान आल्याचेऐकावयास मिळत होते.

याबाबतची अधिक माहिती अशी की ट्रक क्रमांक पी.बी.०४एएफ८४४८ हा पंजाब पासिंग चा ट्रकअसून अंदाजे प्रति पोते ५० किलो याप्रमाणे ६२० तांदळाने भरलेले पोत्यासहीत पलटी झालाही बाबलक्षात येताच फुलवळबहाद्दरपुराकंधार येथे पसरताच तात्काळ या ठिकाणी शेकडो नागरिकांची बघ्यांची गर्दी जमा झाली होती.

ट्रक पलटी होताच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तींनी ट्रक चालकास केबिनच्या बाहेर काढून काही दुखापत झाली काअशी विचारणा करत चालकाचे नाव विचारले असता रामेश्वर उर्फ परमेश्वरकाशिनाथ जाहीर रालिंबोटी तालोहा जिनांदेड येथील रहिवासी असून सदरचा तांदूळ हा बिदर येथून भरून गोंदियाकडे जात असल्याचे सांगत असताना तिथे मोठा बघ्यांचा जमाव झाल्याचे पाहून पुढील माहिती  देता त्या गर्दीचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच कंधार तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक विनोद पावडेपोलीसनिरीक्षक चंद्रकांत जाधवमंडळ अधिकारी शेखग्राम महसूल अधिकारी केंद्रे यांनी घटनास्थळी तात्काळहजेरी लावलीउपस्थित महसूल विभाग  पोलीस अधिकारी यांना घटनेची माहिती विचारली असतायाठिकाणी चालक किंवा मालक उपस्थित नसल्यामुळे त्यांचा शोध घेऊन गाडीत असलेल्या मालाचीरीतसर पावती आहे का ? माल कुठून कुठे चालला होतायाची अद्याप माहिती आम्हाला मिळाली नसून सदर माल लॅब तपासणी कडे पाठविण्यात आले  असून माहिती मिळताच माहितीच्या आधारे दोषीव्यक्तीविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे पुरवठा निरीक्षक पावडे यांनी सांगितले 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button