देश-विदेश

तबला वादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन; वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झालेसॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावरउपचार सुरू होतेतिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला

उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषणपुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होतेत्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह राखा कुरेशीआणि आईचे नाव बीवी बेगम होतेझाकीर यांचे वडील अल्ला राख हेही तबलावादक होते.

झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झालेयाशिवायमुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधूनही पदवीचे शिक्षण घेतले.

झाकीर हुसैन यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. 1973 मध्ये त्यांनीत्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन  मटेरियल वर्ल्ड‘ लाँच केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button