मुखेड तालूका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी सय्यद नजीर यांची बिनविरोध निवड
मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड तालूका ग्रामसेवक संघटनेच्या मुखेड तालुका अध्यक्ष पदी सय्यद नजीर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तालूका ग्रामसेवक संघटनेची दि.२६ डिसेंबर २०१४ रोजी दुपारी 2 वाजता पंचायत समिती मुखेड येथे DNA/ 136 ग्रामसेवक , ग्रामपंचायत आधिकारी संघटना महाराष्ट्र शाखा मुखेड यांची बैठक पंचायत समिती सभागृह मुखेड येथे जिल्हा उपाध्यक्ष पी . जी . नागेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली यावेळी ग्रामसेव ग्रामपंचायत आधीकरी यांच्या उपस्तिथीत निवडीची प्रक्रीया करण्यात आली
ग्रामसेवक , ग्रामपंचायत आधिकारी संघटना ही सदैव न्याय हक्कासाठी राज्यामध्ये कामकरत असते. ग्रामसेवकांना न्याय मिळवून देणे त्यांच्या अडीअडचणी दूर करणे या सर्व बाबीवर ही संघटनासतत प्रयत्नशील असते. मुखेड येथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेल्या मुखेड ग्रामसेवकसंघटनेच्या अध्यक्षपदी सय्यद नजीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यानंतर इच्छूक बेंद्रीकर राजेश , कल्याणकर वसंतराव व इतर ग्रामसेवकांनी समर्थन दर्शवीले तसेच सूचकएम . डी . शिंदे , सतिष गायकवाड , एम . एम अंबुरे यांनी सुचविल्या नुसार सदर नावावर चर्चा झाली वमणियार एम . एम . तसेच रेनगुंटवार बालाजी व सर्व महिला ग्रामसेवक यांच्या अनुमोदनाने सर्वानुमते सय्यदनजीर यांची ग्रामसेवक ग्रामपंचायत आधिकारी संघटना तालुका शाखा मुखेडच्या तालुका अध्यक्षपदी निवडकरण्यात आली व त्यांचा संघटनेकडून भव्य सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या व तसेच महिलाग्रामसेविका सो भवर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला
ग्रामसेवक नजीर सय्यद यांच्या या निवडीबद्दल गटविकास अधिकारी श्री.रामोड, पत्रकार सुशील पत्की, संपादक जयभीम सोनकांबळे, पत्रकार महेताब शेख, पत्रकार विजय बनसोडे, पत्रकार अनिल कांबळे,पत्रकार भारत सोनकांबळे बेटमोगरेकर, सह पंचायत समिती कार्यालय सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातन सय्यद यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.