मुखेडात भारतीय लष्कराचे काँग्रेस कडून अतिशबाजी व घोषणानी अभिनंदन

मुखेड -(ता. प्रतिनिधी)
भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त करणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर‘ चे मुखेड काँग्रेसकडून शहरातील चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून लष्कराचे अभिनंदन करण्यात आले.
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर‘ कारवाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश सचिव श्रावण रॅपनवाड आणि काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुखेड शहरातील चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून भारतीय लष्कर जिंदाबाद भारतीय लष्कराचा विजय असो पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. शहरातील पटेल चौक बसस्थानक चौक बाबा आंबेडकर पुतळा चौक आणि हुतात्मा चौकासह अनेक चौकात फटाक्यांची आतषबाजी करून भारतीय लष्कराची कारवाई जनतेस सांगितले. अचानक झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने शहरात वेगळेच वातावरण निर्माण झाले. विविध शहरातील मुखेड मध्ये सुरू झाली काय अशी चर्चा नागरिकात चालू होती. यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड, तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकर यांच्यासह युवक काँग्रेस शहराध्यक्ष जयप्रकाश कानगुले, ओबीसी शहराध्यक्ष बालाजी वाडेकर,युवा नेता सदाशिव चव्हाण, विलास पाटील इमडे, बालाजी इंगोले, कपिल काठेवाड, ओंकार जाधव, उत्तम कासले, पप्पू कासले, संतोष पवार, महेश धोत्रे, शिवाजी जांभळीकर आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



