शैक्षणिक

मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार.

मुखेड / प्रतिनिधी २१ जून २५

महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत मुखेड येथील शशांक शिरूरकर याने ९९ टक्के गुण मिळवुन नेत्रदीपक यश संपादन केल्या बद्दल मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील शैक्षणीक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मुखेड येथील प्राचार्य किशोरराव शिरूरकर व पिएमश्री,आदर्श शाळा,जि.प. मुलींचे हायस्कूलच्या सहशिक्षिका सौ.अश्विनी कुलकर्णी शिरूरकर यांचे चिरंजीव शशांक शिरूरकर यांने अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत ९९ टक्के गुण मिळविल्याबद्दल तसेच इमरान महेताब शेख हा विध्यार्थी मुखेड येथील गुरुदेव विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयातुन इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम आल्या बद्दल मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दोघांचाही यथोचित सत्कार करण्यात आला आहे.इमरान शेख हा मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेताब शेख यांचा मुलगा आहे.यावेळी पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष अॅड.संदीप कामशेट्टे,मुखेड अध्यक्ष महेताब शेख,दादाराव आगलावे,अॅड. आशिष कुलकर्णी,रामदास पाटील,राजू रोडगे,सौ.अपर्णा कोकंडाकर, सौ.आश्विनी शिरुरकर,अॅड.सौ. मृणाल कुलकर्णी आदीसह अनेकजण यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button