महाराष्ट्र साहीत्य गौरव पुरस्काराने प्रविण जावेद शेख सन्मानित

मुखेड प्रतिनिधी:-
पंचवटी बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र साहीत्य गौरव पुरस्कार लिलावती सतिष आव्हाड फार्मसी कॉलेज खंडगाव मुखेड येथे प्रविण जावेद शेख यांना चंद्रकांत दादा वानखेडे ज्येष्ठ साहित्यीक पुणे,पार्थ नारायण गायकवाड,भैरवनाथ कानडे वक्ते, महेश लांडगे ए.पी.आय, नांदेड, राणी (त्रिवेणी) चोपडे महाराष्ट्र पोलिस, सत्येंद्र राऊत अभिनेता,विलास शिंदगीकर व्याख्याते,रजनी कुलकर्णी पद्मश्री पुरस्कार विजेत्या,रज्जाक शेख
गजलकार,रविंद्र गिमोनकर ज्येष्ठ कवि,अनिता गायकवाड सरपंच, पेठवडज यांच्या हस्ते महाराष्ट्र साहीत्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी त्यांना सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ मोठ्या थाटामाटात सत्कार करण्यात आला
प्रविण शेख यांनी कवी साहित्यिक विविध क्षेत्रात विशेष योगदान दिल्याने त्यांचा गौरव करण्यात आला
प्रविण शेख यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे



