बार्टीच्या कंत्राटी जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांना १५ हजार रुपयांची लाच घेतांना अटक !

नांदेड :०५ जुलै २५
येथील जिल्हा समाज कल्याण कार्यालयात कार्यरत असलेल्या बार्टीच्या कंत्राटी जिल्हाप्रकल्प अधिकारी सुजाता मधुकर पोहरे ह्या १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडल्याने त्यांनालगेच अटक करण्यात आली असल्याने सर्वत्र एकच खळबळ निर्माण झाली. यामुळे समाज कल्याणकार्यालयातील बरेच अधिकारी आणि कर्मचारी फरार झाले होते.
अनुसूचित जातीच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सुजाता पोहरे यांनी नगदी ३० हजार रुपयेमागितले होते. त्या स्वतः अनुसूचित जातीतील असूनही त्यांनी आपल्याच जातीच्या भगिनीला लाचमागितली याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्यावर मोठमोठी भाषणेद्यायची आणि आपल्याच समाज बांधवांचे आर्थिक शोषण करायचे हे कितपत योग्य आहे ? त्यांच्या यादुष्कृत्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चांगलेच वाभाडे काढलेत.
लाच स्विकारतांना अटक झाल्यानंतर सुजाता पोहरे यांची व त्यांच्या कार्यालयाची झाडाझडतीघेण्यात आली, त्यावेळी पन्नास हजार रुपये त्यांच्याकडे आढळून आले. यामुळे त्यांच्या पायाखालचीवाळू सरकली. हडको नांदेड येथील त्यांच्या घराचीही झाडाझडती घेण्यात आली.
गरजू व्यक्तीला हे तीस हजार रुपये लाच म्हणून देणे परवडणारे नव्हते व लाच देण्याची त्यांची ईच्छानव्हती म्हणून त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून भ्रष्ट सुजाता पोहरेवर कारवाईचीमागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोहरे यांच्या कार्यालयात सापळा रचून खात्रीकरुन घेतली व त्यानुसार अचानक धाड टाकली असता सुजाता पोहरे ह्या आपल्या कार्यालयात खुलेआमपंधरा हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पोलिसांच्या हाती लागल्या. अचानक पडलेल्या या धाडीमुळे त्यांचाचेहरामोहराच बदलला. त्यांचा स्वभाव भांडखोर व उद्धटपणाचा असून त्यांच्या असंख्य तक्रारी असल्याचेसमजते.



