सिडको सराफा भागात भर दिवसा व्यापाऱ्याची लाखो रुपयाची बॅग चोरट्याने केली लंपास
नांदेड प्रतिनिधी
सिडको हडको परिसरामधील सराफा व्यापारी लाईन मध्ये सकाळच्या सत्रामध्ये दुकान उघडण्याच्या घाईगडबडीत व्यापारी आपले दुकान उघडत असताना बाजूला ठेवलेले लाखो रुपयाची बाग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच घडली आहे
सविस्तर वृत्त असे की सिडको भागातील सराफा व्यापारी आपले दुकान सकाळी उघडण्याच्या तयारीत होते बॅगमध्ये चार ते पाच लाख रुपये रक्कम व काही दागिने असे ठेवले होते ती बॅग
शेठरच्या जवळ ठेवून सेटरचे कुलूप उघडून दुकान उघडण्याच्या तयारी मध्ये असताना त्याच्यावर पाळत ठेवून असलेले दोन चोरटे त्यापैकी एक जण रोडवर मोटरसायकल उभी करून उभा होता व एक जण त्यांच्या जवळ येऊन त्याची नजर चुकून लाखो रुपयाची असलेली बॅग घेऊन त्याने मोटरसायकल वर थांबलेल्या कडे पळ काढला ही घटना घडल्यानंतर व्यापाऱ्याने आरडाओरडा केला व काहीजण त्याच्या मागे धावले परंतु तो चोरटा बाहेर थांबलेल्या मोटरसायकलवर बसून पसार झाला याबाबतची तक्रार व्यापारी यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली असून पोलीस त्याचा तपास करीत आहेत
या घटनेमुळे मात्र व्यापारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांचा वचक चोट्यावर राहिलेला दिसत नाही भर दिवसाही घटना घडल्यामुळे सामान्य नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे दररोज काहीतरी नवीन नवीन घटना घडत असून या चोरट्या गुन्हेगारावर पोलिसांची वचक राहिली नाही खून दरोडे माऱ्यामाऱ्या लुटमार हे नेहमीच झाल्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे यावर पोलिसांनी त्वरित लक्ष देऊन सर्वच प्रकार बंद करावा अशी मागणी सामान्य नागरिकांतून होताना दिसत आहे



