क्राईम

जाहूर येथील तलावात  उडी मारून वयोवृद्धाने केली आत्महत्या

मुखेड  :- १८ जुलै २५

मुखेड : तालुक्यातील येवती येथील वयोवृद्ध गोविंद रामराव सुडके ८२ वर्ष यांनी जाहूर येथील तलावातउडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि१७ जुलै रोजी उघडकीस आली आहेयाआत्महत्येचे कारण आर्थिक व्यवहार असल्याची चर्चा गावात होत आहे .

सुडके हे १५ जुलै रोजी ” जाहुर येथे बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते पैसे काढून आपल्या पत्नीला दिल्या वर तु चल मी एका व्यक्तीला भेटून येतो असे सांगून निघाले होतेमात्रते घरी परतले नाहीतअनेकतास उलटल्या नंतरही त्यांचा काहीही ठिकाणा  लागल्याने नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध सुरूकेलीदरम्यान१७ जुलै रोजी जाहूर येथील तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संदीप यामावार , बीट जमादार रावसाहेब गिते यांनी घटनास्थळी भेट घेवून जागेचा पंचनामा करून या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणूनकरण्यात आली मृतदेह शवविच्छेदन राजुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉदीपाली पाटील यांनीकेलेगोविंद सुडके यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असूनत्यांच्या कुटुंबीयांवरदुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नीमुलगी  जावई असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button