शेतकरी नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांच्या जनसेवेची १८ वर्ष..

माजलगाव:- १८ जुलै २५
तसं तर २००७ हे साल आयुष्यातील महत्त्वाच्या तीन गोष्टीचं साक्षीदार आहे, पहिलं २००७ ला एल एलबी चं शिक्षण पूर्ण झालं, मी एल एल बी चांगल्या मार्काने पास झालो, दुसरं परीक्षा मार्चमध्ये झाली, आणि २१ एप्रिल २००७ रोजी मी विवाह बंधनात अडकलो, तिसरं २००७ च्या मे महिन्यातच मी माजलगाव जिल्हा व सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी माझे गुरु ॲड. व्हि.जी.तिडके साहेब यांच्याऑफिसला आलो, तेथे मला ॲड. बाबुराव तिडके, ॲड. साहेबराव आचार्य, ॲड.जाधवर मॅडम, ॲड हरिभाऊ बडे हे सहकारी मिळाले, यामध्ये खास करून ॲड बाबुराव तिडके यांना मी आणि आमचे सहकारी नाना म्हणायचो, नाना म्हणजे अगदी सरळ, साधा, प्रत्येकाला आपलं समजणारा, आलेल्या प्रत्येक पक्षकारांना आपुलकीने बोलणारा, त्यांच्या हृदयात घर करणारा एखादा पक्षकार खूपच गरीबघरचा किंवा परिस्थितीने गांगारलेला असेल तर नाना त्याला अगदी तिकिटाला सुद्धा पैसे द्यायचे.. त्यावेळीमी नाना सोबत जास्त वेळ घालवायचो, न्यायालयातील कामकाजाच्या बारीक–बारीक गोष्टी त्यांना निसंकोच विचारायचो, अगदी अर्ज लिहिण्या पासून दावा कसा तयार करायचा, दावा दाखल कसाकरायचा, दावा दाखल केल्यानंतर तो पुढे कोण कोणत्या स्टेज ला लागतो, पहिल्या स्टेज मध्ये आपणकाय करायचे, दुसऱ्या स्टेज मध्ये काय करायचे, तिसऱ्या स्टेज मध्ये काय करायचे हे अगदी लहान मुलासारखं विचारायचो, उलट तपास कसा घ्यायचा, उलट तपासात नेमकं काय आलं पाहिजे, पक्षकाराला तोप्रश्न कशा पद्धतीने विचारायचा, उलट तपासात साक्षीदार आपल्याला पाहिजे तसे उत्तर देत नसल्यासआपण कुठला प्रश्न विचारायचा, हाजरी माफीच्या अर्ज काय कारण लिहायचं हे सगळं विचारायला मलाकधीच लाज वाटली नाही, त्याचंही कारण होतं नाना जसे सगळ्यांशी आपुलकीने वागायचे त्याहीपेक्षामाझ्याशी अधिकच आपुलकीने जिव्हाळ्याने वागायचे, मला चांगलं अठवतयं २००७ मध्ये अगदी ऑगस्ट महिन्यात म्हणजे मला त्यावेळी वकिलीत ला “व” देखील कळत नव्हता त्यावेळी मला नानांनी माजलगाव येथील दुसरे सह दिवाणी न्यायाधीश महेश नातू साहेब यांच्या न्यायालयात दिवाणी दाव्याच्या एका प्रकरणात उलट तपास समोर बसून घ्यायला लावला होता, खरं तर त्या उलट तपासातला प्रत्येक प्रश्ननानांनी मला माझ्या शेजारी बसून कागदावर वरचेवर लिहून दिलेला व्हता, याच्या पुढे जाऊन नानांनीमला पहिले दिवाणी न्यायाधीश व. अ.अ. ग देशमुख साहेब यांच्या न्यायालयात मनाई हुकूमाच्या अर्जावर युक्तिवाद करायला लावला होता आणि विशेष म्हणजे त्या प्रकरणात आम्हाला मनाई हुकूम मिळाला होता, पुढे काही काळ माझी नाना सोबत चांगली गट्टी जमली होती, अगदी सकाळी, संध्याकाळी ऑफिसला जायचो, संध्याकाळी सिनियर तिडके दादा ऑफिसमध्ये कधी यायचे, कधी नाही यायचे, पणनाना मात्र दररोज संध्याकाळी ऑफिसमध्ये येऊन दुसऱ्या दिवशीच्या बोर्डावरील फायली काढायचे अनंमला फक्त फाईल वाचा म्हणायचे, मी प्रत्येक फाईल वाचायचो प्रत्येक फाईल मधील परिस्थिती वेगळीअसायची, प्रकरण वेगळे असायचे, ते काही लवकर लक्षात यायचे नाही, मग त्याबाबत मी नानांना विचारायचो की नाना हे कशाचं प्रकरण आहे मग नाना साध्या शब्दात मला समजून सांगायचे आणि त्याफाईल मध्ये आता पुढे काय होणार, आपण पुढे काय करणार हे सगळं सांगायचे अगदी दीड वर्षातनानांनी मला जवळजवळ सर्वच प्रकरणांची आणि सर्व प्रकारची चांगलीच माहिती दिली होती, त्यानंतर मात्र वडवणी तालुक्यात दिवाणी न्यायालय स्थापण झाले, आमच्या ऑफिसच्या बऱ्याच फायली वडवणीकडे ट्रान्सफर झाल्या त्या फायली चालवण्यासाठी नाना वडवणी ला गेले, पुढे २४ एप्रिल २०१० रोजी मीस्वतंत्र प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे स्वतंत्र प्रॅक्टिस करण्यासाठी न्यायालयात ऑफिससुरू केले त्याचे उद्घाटन माझे गुरु ॲड विठ्ठलराव तिडके दादा यांच्या हस्ते झाले, पुढे वकिलीतुनच ॲड रामरावजी नाटकर यांच्या सहवासात आल्याने आणि एस एफ आय सारख्या विद्यार्थी संघटनेची पूर्वीची पार्श्वभूमी मला लाभलेली असल्याने, मी नाटकर साहेबांसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम सुरूकेलं, त्याच दरम्यान माजलगाव येथे तत्कालीन खासदार राजू शेट्टी व संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचीमोंढा मैदानावर खूप मोठी सभा आम्ही त्यावेळी घेतली, आपल्याकडील साखर कारखानदार मंडळी पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक पटीने शेतकऱ्यांना लुटण्याचं काम करत होते ते आजही करतात म्हणा मात्र खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची सभा झाल्याबरोबर माजलगाव सहकारी साखरकारखान्याने शंभर रुपयाची उसाचे बिल काढले.. आणि मी संघटने कडे जास्तच आकर्षित झालो.. पुढेनाटकर साहेब माझे नेते आणि मी त्यांचा कार्यकर्ता, त्यांनी देखील मला अगदी लहान लहान गोष्टी बारकाईने शिकवल्या त्यामुळेच चळवळीशी प्रामाणिक राहून आज देखील लाल झेंडा घेऊन चळवळीत काम करतो आहे याचा देखील मला मनस्वी आनंद आहे, परंतु चळवळीत काम करत असताना वकिलीकडे किंचितही दुर्लक्ष मी होऊ दिलेले नाही, वकिली करत असताना माझ्या पक्षकाराला न्यायमिळाला पाहिजे, तसेच लहानपणापासूनच मी आई–वडिलांनी केलेले काबाडकष्ट डोळ्याने पाहिले आहे, मी देखील दारिद्र्याच्या अनेक झळा सहन केलेल्या असल्याने पक्षकाराबद्दल कायम आदर ठेवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रमाणिकपणे लढत आलेलो आहे, या काळात अनेक वेगवेगळे पक्षकार, अनेक न्यायाधीश, अनेक कर्मचारी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव घेता आला, या काळात अनेक चांगली माणसे भेटली तशी वेगवेगळ्या बाजूने विचार करणारी माणसं देखील भेटली पण गरिबीचीजाणीव मी कधीही विसरलो नाही, आज तब्बल 18 वर्ष गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, पीडित, उपेक्षितलोकांना केंद्रस्थानी ठेवून वकिली करत आलो, या अठरा वर्षाच्या काळात चांगले वाईट अनेक अनुभवघेता आले, शेकडो प्रकरणात विनामूल्य सेवा देखील देण्याचा प्रयत्न केला, वकील करत असताना आपल्या पक्षकाराला न्याय मिळवून दिल्यानंतर जो पक्षकाराच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतानापाहिला, तो आनंद मला कायम प्रेरणा देत राहिला. आज तब्बल १८ वर्षापासून वकील करत असताना सामाजिक दायित्व स्वीकारून शेतकरी कामगार पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून न्यायालयाच्या बाहेरदेखील विविध कार्यालयात जाऊन मला अनेक उपेक्षित लोकांना विना मोबदला न्याय मिळवून देताआला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध आंदोलने करताना मला वकीलीच्या माध्यमातून जोडलेल्या अनेक पक्षकाराचे सहकार्य लाभत गेले, त्यातून मला माझी स्वतंत्र ओळख निर्माण करता आली, भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात सर्वसामान्य, उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी, जनतेची ढाल म्हणून उभं राहता आलंयाचा आनंद शब्दात सांगता येणार नाही. खरं म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या अतिसामान्य व्यक्तीला घडवण्यात जिल्हा परिषद प्रथमीक शाळा बडीबाडी चे गिरी सर, कुलकर्णी सर, नागटिळकसर,ढवळे सर, कांबळे गुरुजी, राठोड सर,सरवदे गुरुजी, व्यंकटेश विद्यालय गातेगाव चे गंगणे सर,मस्केमॅडम, चव्हाण सर,धुळे सर आणि माजलगाव तालुक्याचे भाग्यविधाते आणि महात्मा ज्योतिराव फुले वकर्मवीर भाऊराव पाटलांचे कृतिशील वैचारिक वारसदार माजी आमदार मोहनराव काका सोळंके यांच्यासह महात्मा फुले विद्यालय मोठीवाडीचे आर बी तांबोळी, मधुकरराव शिंदे, करवा सर, देशमुख सर, उत्तम राठोड सर,रामेश्वर गिरगुणे सर, त्रिंबक फपाळ सर. माजलगाव महाविद्यालय माजलगाव चेपृथ्वीराज तौर सर, भाऊसाहेब राठोड, दिवंगत श्रीहरी काळे, दिवंगत शेजुळ सर, सोळंके सर, चव्हाण सर, साळवे सर, पुरी सर, कुलकर्णी सर. विधी महाविद्यालय बीडचे राजेश देशमुख सर, फपाळ सर, कृष्णराव पंडित सर, साबळे सर, देशपांडे सर वाघमारे सर, बोटलवार सर, पाईकराव सर, गीते सर, वायाळ सर याशिक्षक,प्राध्यापक मंडळींचाही खूप मोठा वाटा आहे, याशिवाय समाजकारणात डॉ. प्रा. संतोष रणखांबसर, राजकारणात एडवोकेट रामरावजी नाटकर साहेब,वकिली पेशातील सीनिअर्स मंडळी आणिसहकारी यामध्ये खास करून ॲड विठ्ठलराव तीडके दादा, बाबुराव तिडके नाना ॲड सर्जेराव अण्णारांजण, ॲड. आर वाय कुलकर्णी, ॲड पि.टी. तौर साहेब, ॲड टी एन कोल्हे साहेब, ॲड रंजीतजी वाघमारेयांचा उल्लेख टाळता येणार नाही.
आज माझ्या वकिलीला तब्बल १८ वर्षे पूर्ण होत असताना येणाऱ्या काळात आपल्या सर्वांचे सहकार्यअसेच लाभो याशिवाय पिढीत, उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधीमिळो.. हीच निर्मात्यास प्रार्थना..
आपला
भाई ॲड नारायण गोले पाटील,
(शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती समिती सदस्य)
जिल्हा व सत्र न्यायालय माजलगाव जिल्हा बिड
मो.8459490850



