Uncategorized

सावधान ‘थर्टी फर्स्ट’ला धिंगाणा घालाल, तर ‘हॅप्पी न्यू इयर’ कोठडीत होणार !

मुखेड (प्रतिनिधी) बल्खी आसद

३० डिसेंबर २५

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या जल्लोषाला गालबोट लागू नयेयासाठी नांदेड जिल्हा पोलिस प्रशासन सज्ज झाले आहेमद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांवर आणि भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहेअनुचित प्रकार घडल्यास संबंधितांची रवानगी थेट कोठडीत केली जाईलअसा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.

नगरपालिका निवडणुकांचा हंगाम नुकताच संपल्याने राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहेत्यामुळे यंदाचा ‘थर्टी फर्स्ट‘ अधिक जंगी होण्याची शक्यता आहेहीच बाब लक्षात घेऊन शहराच्या चारही कोपऱ्यांवर कडक नाकाबंदी करण्यात येणार आहेविशेषतः हॉटेलढाबे आणि शहराबाहेरील रस्त्यांवर गस्त वाढवण्यात येणार आहे.

या विनापरवाना पार्ट्या व जल्लोषावर पोलीस तसेच अन्न आणि औषध प्रशासनाची (एफडीएकरडीनजर असणार आहेएफडीएचे अधिकारी  पोलीस या कारवाईत सहभागी होणार असल्याची माहितीआहे.

तालुक्यांत मावळत्या वर्षाचा जल्लोष  येणाऱ्या वर्षाचे स्वागत म्हणून मोठ्या संख्येत पार्ट्या होतातपार्ट्या मध्ये तरुणाई राहतेसध्या सोशल मीडियावर नववर्षाच्या स्वागताच्या तयारीबाबत चर्चा सुरूझाली आहेतरुणाईकडून हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पार्ट्या चे नियोजन केले जात आहे३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहर  ग्रामीण परिसरातील हॉटेल्स सजणे सुरू झाले आहेतमोठ्या हॉटेलपासून साध्या हॉटेल्स आकर्षक रोषणाई केली जात आहेग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही हॉटेल चालकांनीडीजेलाइव्ह गाण्यांचे शो आयोजित केले आहेतहॉटेलमध्ये कॉलेजचे विद्यार्थीआयटी मध्ये कामकरणाऱ्या तरुणतरुणी फोन करून विविध ऑफर्सची माहिती घेत आहेतग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्सने मेन्यूवर सवलती  विशेष पॅकेजची व्यवस्था केली आहे.

तरुणतरुणींना विशेष सवलत दिली जात आहेया पार्ध्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची करडीनजर असणार आहेफूड सेफ्टी ऑफिसरकडून हॉटेल्सची तपासणी केली जाणार असूनअन्नपदार्थाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेतकमी दर्जाचेबनावट आणि असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास त्या हॉटेल चालकांवर कारवाई केली जाणार आहेधागडधिंगा करणाऱ्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जेलची हवा खावी लागू शकते.

अनेक जण नववर्षाच्या जय्यत तयारीलाही लागले आहेतअनेकांनी हॉटेलढाबे बुकिंगही केले आहेततर अनेकांनी मोकळ्या मैदानातसार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक लावून नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याचे नियोजन केले आहेमात्रसार्वजनिक ठिकाणीमोकळ्या जागेत पार्टी करण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button