सामाजिक

संशयीताच्या घरावर बुलडोझर चालवणे ही हुकूमशाही कोरटकर, सोलापूरकर यांच्या घरावर संरक्षण का?-डॉ श्रावण रॅपनवाड

मुखेड प्रतिनिधी:- दि. २४ मार्च २५
संवैधानिक न्यायव्यवस्थेची प्रतीक्षा न करता एका विशिष्ट समाजाच्या आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवणाऱ्या राज्य शासनाकडून महाराष्ट्राची अस्मिता शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार असा सवाल काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपणवाड यांनी केला आहे.
नागपूर दंगली प्रकरणी संशयित आरोपी फहीम खान याच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धी माध्यमांना बोलताना डॉ श्रावण रॅपनवाड म्हणाले की, संविधान आणि न्यायव्यवस्थेत एखाद्या संशयित आरोपीचे गुन्हेगारी कृत्य सिद्ध झाल्यानंतर त्यांना शिक्षा करण्याची तरतूद असतानाही संशयित आरोपीच्या घरावर बुलडोजर चालवून त्या संशयीताच्या परिवाराचा आशियाना उद्ध्वस्त करणे ही निव्वळ हुकूमशाही कृती आहे. याचा अर्थ राज्य शासन म्हणेल तो कायदा व स्वतःला न्यायव्यवस्थेपेक्षा मोठे समजणे होय. शिवाय मुख्यमंत्र्यांकडून ही कृती केवळ विशिष्ट समाजाच्या विशेषता मुस्लिम संशयित आरोपींच्या विरोधातच केली जात आहे. एखाद्या गुन्हेगाराचे कृत्य म्हणजे त्याच्या परिवारातील सदस्यांच्या सहभाग नव्हे. न्यायव्यवस्थेत सदर आरोपी चा गुन्हा सिद्ध झाला तर त्याला शिक्षा नक्कीच होईल, त्याच्या कुटुंबीयांना त्रास कशासाठी द्यावा?जर मुख्यमंत्री किंवा राज्य शासन पारदर्शीपणे गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी कायद्यातील तरतुदींची प्रतीक्षा करू शकत नसेल तर मग या पुरोगामी महाराष्ट्रात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महात्म्यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर आदींच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? त्यांच्या घरावर संरक्षण का देता?असे सवाल डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button