शहर

दुःखद घटना. मुखेड तालुक्यातील हिरानगर तांडा येथील भूमीपुत्र शहीद

मुखेड प्रतिनिधी

लेह मध्ये आपले कर्तव्य बजावत असताना बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या हिरानगर येथील जवानास वीर मरण आल्याची दुःखद घटना घडली आहे.

मुखेड तालुक्यातील हिरानगर येथील रहिवासी असलेले वीर जवान सुधाकर शंकर राठोड (वय- ३९,) मंगळवार दि. १२ नोव्हेंबर रोजी लेह मध्ये आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्या अंगावर बर्फाचा ढीगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली ते गाडले गेले. यानंतर त्यांचा शोध सुरू झाला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जवानाचा तिसऱ्या दिवशी शोध लागला. जवानास उपचार करिता जम्मू येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवानाची तब्येत ही गंभीर असल्या कारणास्तव त्यांच्या डोक्यावर जम्मू येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. जवानाची परिस्थिती ही अतिशय नाजूक होत असल्यामुळे १६ नोव्हेंबर रोजी चंदिगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारा दरम्यान सुधाकर राठोड या जवानास वीर मरण आले.हवलदार सुधाकर शंकर राठोड हे १२७ लाईट एअर डिफेन्स रेजिमेंटचे जवान होते. त्यांच्या मागे भाऊ मधुकर शंकर राठोड, पत्नी श्रीमती आशा सुधाकर राठोड, मुलगा ओम सुधाकर राठोड (वय ८ वर्ष), मुलगी सपना सुधाकर राठोड (वय ६ वर्ष) आहे. भाऊ मधुकर शंकर राठोड, वडील शंकर राठोड यांचे दोन वर्षाखाली निधन झाले होते..
हैदराबाद वरून बाय रोड मुखेड येथे रवाना होणार आहे. अंत्यविधी दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ रोज बुधवार सकाळी १० : ०० वाजता. शासकीय ईतमामात जन्मगाव हिरानगर तांडा ता. मुखेड येथे होणार आहे

शहीद राठोड कुटुंबियांच्या दुःखात श्रमिक एकता न्यूज परिवार सामील आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button