सामाजिक
मुखेड शहर आणि परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के!

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ११ एप्रिल २६
आज सकाळी मुखेड शहर व परिसरातील ग्रामीण भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी साधारण ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला अनेक नागरिकांना जमिनीतून गुढ आवाज आल्याचा अनुभव आला. हे धक्के सौम्य स्वरूपाचे असले, तरी अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकान मधे भीतीचे वातावरण होते.
सकाळी ८:४५ च्या दरम्यान धक्के सौम्य असल्याने सुदैवाने अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.



