सामाजिक

मुखेड बस स्थानक परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १० एप्रिल २६

येथील बस स्थानक परिसरात आज एक इसम मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, नागरिकांनी ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुखेड पोलिसांनी केले आहे.

सविस्तर वृत्त असे की, मुखेड येथील बस स्थानक जवळ आज एक मध्यमवयीन इसम संशयास्पद रित्या मृत अवस्थेत मिळून आला. घटनास्थळाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला आहे. सदर मृत व्यक्ती ही नेमकी कुठली आहे आणि त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

सध्या हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

जर आपल्या परिसरातील किंवा ओळखीचा कोणी व्यक्ती बेपत्ता असेल किंवा या मृत व्यक्तीबद्दल कोणास काही माहिती असल्यास, त्यांनी त्वरित पोलीस स्टेशन मुखेड येथे संपर्क साधावा.

संपर्क क्रमांक: 📞९३२५१७१४१९

नागरिकांनी या बातमीला जास्तीत जास्त शेअर करावे जेणेकरून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांपर्यंत माहिती पोहोचण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button