सामाजिक

मुखेड उपजिल्हा रुग्णालयात ११ महिन्यांच्या चिमुरड्याला सुया टोचून केले जखम; ‘हिंद लॅब’च्या कर्मचाऱ्यांची मुजोरी!

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २० मे २६

येथील उपजिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि ‘हिंद लॅबच्या कर्मचाऱ्यांचा अमानुष चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहेरुग्णालयात भरती असलेल्या अवघ्या ११ महिन्यांच्या कार्तिक सुनील तोटरे या निष्पाप बालकाचे रक्ताचे नमुने घेण्यास लॅब कर्मचाऱ्यांनी स्पष्ट नकार दिलाइतकेच नव्हे तर, “आम्हाला एवढ्या लहान मुलाचे रक्त काढता येत नाही” असे म्हणून नातेवाईकांशी अत्यंत उद्धट अर्वाच्य भाषा वापरत त्यांना बाहेर हाकलून दिलेया संतापजनक प्रकारामुळे मुखेड परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसारदि१९ मे २०२६ रोजी हा प्रकार घडलाताप आणि त्रासामुळे बेजार असलेल्या चिमुरड्या कार्तिकला उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी रक्त तपासणी करण्यास सांगितलेमात्ररुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संवेदन शून्यता दाखवत नातेवाईकांना दोन तास संपूर्ण दवाखान्यात फिरवले.

नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रथम १७ नंबर रूममधून १३ नंबरला पाठवलेतिथून ३१ नंबरलापुन्हा १३ नंबर आणि तिथून परत १७ नंबरला… अशी रुग्णांच्या नातेवाईकांची क्रूर थट्टा शासकीय रुग्णालयात सुरू होतीया गोंधळात आणि हलगर्जी पणामुळे त्या निष्पाप लहान बाळाला जागोजागी सुया टोचून गंभीर जखमा करण्यात आल्या.

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरनर्स आणि कोट्यवधींचे कंत्राट घेतलेल्या ‘हिंद लॅबच्या कर्मचाऱ्यांनाजे काम जमले नाहीते काम नातेवाईकांनी बाळाला एका खासगी लॅबमध्ये नेल्यानंतर तिथल्या तंत्रज्ञांनी अवघ्या काही सेकंदात करून दाखवलेयावरून सरकारी रुग्णालयातील आणि हिंद लॅब मधील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि पात्रतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “तोंडात गुटखामटेरेलठेवून रुग्णांशी उद्धटपणे बोलणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांमुळेच सरकारी दवाखान्याची बदनाम होत आहे,” असा घणाघाती आरोप नागरिकांनी केला आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत ‘मातंग अस्मिता संघर्ष सेना‘ (MASS ORG) या संघटनेने वैद्यकीय अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना लेखी निवेदन देऊन दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहेरुग्णांची होणारी हेळसांड थांबवून संबंधित उद्धट कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करावीतसेच या प्रकरणी प्रशासनाने केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावाअन्यथा संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईलअसा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष नितीन तलवारेमराठवाडा उपाध्यक्ष मारोती भालेरावजिल्हाध्यक्षसंतोष भालेरावजिकायदेविषयक सल्लागार ॲडबाबाराव वाघमारेतालुकाध्यक्ष सुनील तोटारेयुतालुकाध्यक्ष संदीप नामवाडतासोशल मिडिया प्रमुख जयपाल बोडके आणि तासचिव सुनील पाळेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button