क्राईम

स्विमिंग पूलमध्ये सुरक्षा रक्षकांचा अभाव? ९ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू; परिसरात हळहळ

नांदेड – (हिमायतनगर) :- श्रमिक एकता न्यूज़ १४ मे २६


स्विमिंग पुलमध्ये पोहोण्यासाठी आलेल्या 9 वर्षाच्या चिमुकल्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. हिमायतनगर शहरातील स्विमिंग पूल मध्ये ही घटना घडली. सक्षम गायकवाड असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. सक्षम आपल्या आजोळी भिसी येथे आला होता. हिमायतनगर मध्ये नव्यानेच सुरु झालेल्या गिरीजा स्विमिंग पूल मध्ये नेण्याचा त्याने आईकडे हट्ट केला.

मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी आज दुपारी सक्षमला घेऊन त्याची आई गिरीजा वॉटर स्विमिंग पुलवर गेली. सक्षम आतमध्ये गेला आणि त्याची आई बाहेर वाट पाहत थांबली होती. स्विमिंगचा एक तास वेळ संपूनही सक्षम बाहेर न आल्याने आईने विचारपूस केली.
आईने विचारपूस केल्यानंतर धावपळ उडाली. सक्षमचा शोध घेतला असता तो पाण्याच्या तळाशी आढळला. तात्काळ त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. स्विमिंग पुलमध्ये प्रशिक्षित ट्रेनर आणि पुरेशी काळजी घेतली गेली नसल्याने ही घटना घडली. स्विमिंग पूल चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. या घटनाने हिमायतनगरमध्ये शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button