क्राईम

मुखेडचे माजी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे परभणीत थेट निलंबित; अवैध धंद्यांना खतपाणी घातल्याने एसपींची धडक कारवाई!

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ २४ मे २६

मुखेड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्य करून गेलेले आणि सध्या परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांना शासकीय सेवेतून थेट निलंबित करण्यात आले आहेपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणेअवैधधंद्यांना खतपाणी घालणे आणि पोलीस दलाची प्रतिमा मलीन होईल असे कृत्य केल्याच्या गंभीर आरोपावरून परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी ही धडक कारवाई केली आहेविलास गोबाडे हे मुखेड येथे कार्यरत राहिलेले असल्याने या निलंबनाच्या वृत्तामुळे मुखेड तालुक्यातही प्रचंडखळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसारपोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या कार्यपद्धतीवर आणि विविधबाबींमध्ये आढळणाऱ्या अनियमिततेमुळे त्यांची २० मे रोजी तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होतीया बदलीनंतर परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी घोबाडे यांच्या कार्यकाळातील विविध संशयास्पद बाबींची सखोल माहिती घेतलीप्राथमिक चौकशीत तथ्य आढळताचएसपींनी कोणतीही कसूर  ठेवता थेट त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केलेनिलंबन कालावधीत विलास घोबाडे यांचे मुख्यालय हे नियंत्रण कक्ष राहणार आहे.

या कारवाईच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेदारांना आणि अधिकाऱ्यांना अत्यंत कडक शब्दांत चेतावणी दिली आहे. “जिल्ह्यात कुठेहीकोणत्याही प्रकारे अवैध धंदे चालू देणार नाहीजर कोणी अधिकारी अवैध धंद्यांना पाठीशी घालत असेल किंवा त्यातसामील असेलतर त्याची गय केली जाणार नाही आणि अशीच थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा एसपींनी दिला आहे.

विलास घोबाडे यांनी मुखेड येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिलेले असल्याने येथील स्थानिक नागरिकांना आणि पोलीस वर्तुळाला त्यांचा कार्यकाळ चांगलाच ठाऊक आहेपूर्णा येथे त्यांच्यावर झालेल्या या थेट कारवाईमुळे परभणीसह नांदेड जिल्ह्यातीलही ‘अर्थपूर्ण‘ व्यवहार करणाऱ्या आणि अवैध धंद्यांकडे डोळेझाक करणाऱ्या काही अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेतएसपींच्या या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस दलात सध्या याच निलंबनाची जोरदार चर्चा रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button