सामाजिक

लग्नातील वायफळ खर्चाला फाटा! पेठकर कुटुंबाने लग्नकार्यातून काढला संपूर्ण गावाचा ‘अपघाती विमा’

कंधार प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २३ मे २६

लग्न म्हटलं की डोळे दिपवणारा बडेजावअवाढव्य खर्च आणि पैशांची उधळण हे समीकरण आताठरलेलं असतंपण याच थाटामाटाला फाटा देतनांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरायेथील पेठकर कुटुंबाने समाजासमोर एक नवा आणि आदर्श पायंडा घालून दिला आहेआपल्या घरातीलविवाहसोहळ्याचे औचित्य साधत या कुटुंबाने गावातील तब्बल साडेतीन हजार नागरिकांचा अपघातीविमा उतरवला असूनत्यांच्या या पुरोगामी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सामान्यतः ‘धोंड्याचा महिना‘ (अधिक मासहा शुभकार्यासाठी वर्ज्य मानला जातोया काळात लग्नकिंवा इतर मंगल कार्ये करण्याचे अनेकजण टाळतातमात्रअंधश्रद्धा आणि जुन्या रूढीपरंपरांना छेददेत पेठकर कुटुंबाने याच महिन्यात विवाहसोहळा संपन्न केलाकेवळ लग्न उरकले नाहीतर त्यालासामाजिक भान आणि कर्तव्याची अनोखी जोड दिली.

लग्नात मानपानअवाजवी रोषणाई किंवा जेवणावळींवर लाखो रुपयांचा चुराडा करण्याऐवजीपेठकरकुटुंबाने गावातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेचा विचार केलाबहाद्दरपुरा गावातील सुमारे ,५००लोकांचा अपघाती विमा काढून त्यांनी एकाच वेळी संपूर्ण गावाला सुरक्षिततेचे कवच बहाल केले आहे.

आजकाल लग्नांमध्ये होणारा बडेजाव कर्जबाजारीपणाला कारणीभूत ठरत असतानापेठकर कुटुंबानेघेतलेला हा निर्णय डोळे उघडणारा आहे. “लग्न असावं तर असं!” अशीच भावना आता परिसरातीलनागरिकांमधून व्यक्त होत आहेसोशल मीडियावरही या ‘विमा लग्नाची‘ जोरदार चर्चा सुरू असूनहापुरोगामी विचार इतर कुटुंबांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button