क्राईम

मुखेड पोलिसांची मोठी कारवाई: ३५.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त; अवैध वाळू आणि गुटखा माफियांवर धडक कारवाई

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १२ जुलै २६

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉनिलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत मुखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहेपोलिसांनी अवैध रेतीवाहतूक करणारा एक हायवा टिप्पर आणि प्रतिबंधित गुटखा असा एकूण ३५ लाख ५९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

दिनांक १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी .०० वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड यांना त्यांच्या गुप्त बातमीदारां मार्फत गोपनीय माहिती मिळाली होतीमौजे बेरळी फाटा (तामुखेडयेथे एका व्यक्तीकडे प्रतिबंधित गुटखा असून तो त्याची विक्री करत असल्याची पक्की माहिती त्यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे मुखेड पोलिसांनी सापळा रचून पंचांसमक्ष छापा टाकलात्यावेळी तिथे एका व्यक्तीकडे १४,१०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आलापोलिसांनी सदर गुटखा जप्तकेला आहे. आरोपी संभाजी जयवंत शिंदे (वय १९ वर्षेराबेळीतामुखेडजिनांदेड या विरुद्ध पोलीस ठाणे मुखेड येथे गु..नं२१३/२०२६ नुसार कलम १२३२७५२२३ (भा.न्या.सं.) सह ५९(), २६(), २७२३३०()(अन्न सुरक्षा  मानके प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

दुसरी कारवाई त्याच दिवशी१० जुलै २०२६ रोजी सायंकाळी .०० वाजताच्या सुमारास मौजे बेटमोगरा येथील पेट्रोल पंपासमोर करण्यात आलीहायवा क्र. TS15UE0444 मधून अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सदर टिप्पर अडवून त्याची पाहणी केली.

त्यामध्ये विनापरवाना अवैध लाल रेती आढळून आलीपोलिसांनी अंदाजे ०९ ब्रास रेती (किंमत ४५,०००रुपयेआणि रेतीची वाहतूक करणारा हायवा टिप्पर (किंमत ३५,००,००० रुपयेअसा एकूण३५,४५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक आरोपी (चालक) अजित पंढरीनाथ पाटील (वय ३५ वर्षेरापिंपळगावतादेगलूर) या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गु..नं२१४/२०२६ नुसार कलम ३०३() BNS सह कलम ४८(), ४८(जमीनमहसूल अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर दोन्ही कारवाया मापोलीस अधीक्षक डॉनिलाभ रोहनअप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (देगलूर). किरण पोफळघट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.

या मोहिमेत मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिंतांबर कामठेवाडपो.उप.निगणेश मानेपो.उप.निअभिजीत तुतूरवाडतसेच पोलीस अंमलदार यादव इबितवारशंकर बेलाडेवीरभद्र पाटीलमन्मथ गौडआणि अमोल सुंडगे यांनी सहभाग घेतला.

नांदेड जिल्हा पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे कीकोणत्याही प्रकारची अवैध गौण खनिजवाहतूकसाठवणूक तसेच अवैध गुटखा वाहतूक  विक्री बाबत माहिती आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावीअशा अवैधकृत्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button