क्राईम

मुखेड भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोरी; १५ हजारांची लाच स्वीकारताना शिपाई रंगेहाथ अटकेत

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क:- ०३ सप्टेंबर २६

मुखेड येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेला शिपाई विवेकानंद पांडुरंग खुडे (वय ३५याला १५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे७२ वर्षीय तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असलेल्या शेतजमिनीची मोजणी करून त्याचा अहवाल न्यायालयात पाठवण्यासाठी आरोपी शिपाई खुडे आणि निमतानदार सय्यद इमरान सय्यद इकबाल यांनी या लाचेची मागणी केली होती३१ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदाराने कार्यालयात जाऊन चौकशी केली असतापैसे दिल्याशिवाय अहवाल पाठवला जाणार नाही असे सांगत १५ हजार रुपयांची मागणीकरण्यात आली होतीत्यानंतर  सप्टेंबर रोजी एसीबीने केलेल्या पडताळणीत शिपाई खुडे आणि निमतानदार सय्यद इमरान यांनी लाच घेण्यास संमती दिल्याचे निष्पन्न झालेयाच दिवशी दुपारी भूमी अभिलेख कार्यालयमुखेड येथे सापळा रचून तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच स्वीकारताना शिपाई खुडे याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असूनमुखेड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहेही कारवाई नांदेड एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटेअपर अधीक्षक डॉअश्विनी जगताप  उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर आणि त्यांच्या पथकातील अंमलदार राजेश राठोडबालाजी मेकालेसय्यद खदीर  प्रकाश मामुलवार यांनी केलीकोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी निर्भयपणे एसीबीशी संपर्क साधावाअसे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नोट:- सदरील फोटो ही Ai तंत्रज्ञानाने बनवलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button