ॲड. सुनील पौळकर यांची नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: १६ ऑगस्ट २६
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मुखेड येथील ‘दैनिक सकाळ’चे बातमीदार तथा ॲड. सुनील पौळकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी या महत्त्वपूर्ण निवडीची अधिकृत घोषणा केली.
मुखेड येथील ‘दैनिक सत्यप्रभा’ कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात ही निवड जाहीर करण्यात आली. ॲड. पौळकर यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याची आणि योगदानाची दखल घेत त्यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या निवडीच्या घोषणेप्रसंगी मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने तालुकाध्यक्ष प्रा. यशवंत बोडके, सचिव ज्ञानेश्वर डोईजड, कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशमुख, उपाध्यक्ष संतोष बेळगे, संघटक दत्तात्रय कांबळे, कोषाध्यक्ष रामदास पाटील आणि पत्रकार नामदेव श्रीमंगले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या निवडीबद्दल सर्व उपस्थित पत्रकार बांधवांनी ॲड. सुनील पौळकर यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या भावी वाटचालीस आणि पुढील पत्रकारितेच्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.



