क्राईम

संतापजनक! नांदेडमध्ये किराणा सामान आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम गजाआड

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क, नांदेड | १७ सप्टेंबर २०२६

नांदेड शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हमालपुरा येथे हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी किराणा सामानाची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. याचवेळी आरोपी आदिनाथ जाधव (वय २८) याने तिला रस्त्यात एकटी गाठले. त्यानंतर नराधमाने तिला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला. या भयंकर घटनेची माहिती मिळताच हादरलेल्या पीडितेच्या आईने तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत आरोपी आदिनाथ जाधव याला तात्काळ बेड्या ठोकल्या असून, त्याच्याविरुद्ध ‘पॉक्सो‘ कायद्यांतर्गत कठोर गुन्हा दाखल केला आहे.

सध्या पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेआहे. पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी स्पष्ट केले की, पीडितेच्या पालकांकडून सर्व आवश्यककागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबत पुढील वैद्यकीय निर्णयघेतले जातील. या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेशपुरी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button