Uncategorized

परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवण्यासाठी पैसे मागितले

मुखेड/प्रतिनिधी

मुखेड उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (एच.एस.सी) बैठी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर परीक्षा केंद्रांवर नकलसाठी पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याविरोधात एसएफआय संघटनेने जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटशिक्षण अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन दिले असून, तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

एसएफआय चे जिल्हाध्यक्ष विजय लोहबंदे यांनी आरोप केला की, बैठे पथक प्रमुख द्याडे नागनाथ (शिक्षण विभाग, पंचायत समिती, मुखेड) आणि त्यांचे सहकारी तलाठी गहीरवार जी. बी., ग्रामसेवक कारभारी पी. जी., बेन्द्रीकर आर. एम., कृषी सहाय्यक पाटणकर आर. एस. यांनी काही परीक्षा केंद्रांवर नकलसाठी पैशांची मागणी केली. ज्या केंद्रांवर पैसे दिले, तिथे कॉपीसाठी मोकळीक देण्यात आल्याचे आरोप आहेत.

एस एफ आय ने स्पष्ट इशारा दिला आहे की, यावर तत्काळ कारवाई न झाल्यास हजारो विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

राज्य सरकारच्या कॉपीमुक्त धोरणाला हरताळ फासणाऱ्या या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button