राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त तालुका कृषी कार्यालयाकडून पत्रकारांचा सन्मान

मुखेड प्रतिनिधी:-
भारतातील पत्रकारिता कानाकोप-यात पसरावी त्याची वाढ व्हावी व गुणवत्तात्मक विकास व्हावा, यासाठी केंद्र सरकारनं ४ जुलै १९६६ रोजी प्रेस काउंसिल ऑफ इंडियाची स्थापना केली. १६ नोव्हेंबर १९६६ रोजी काऊंसिलचं काम विधिवत सुरू झालं. तेव्हा पासूनच हा दिवस ‘राष्ट्रीय पत्रकारिता दिन’ म्हणून साजरा होऊ लागला. मराठीत बाळशास्त्री जांभेकर यांनी २१ जून १८३२ मध्ये ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केलं. याच काळात हिंदी व अन्य भारतीय भाषांमध्ये अनेक वृत्तपत्रं सुरू झाली.
पत्रकारिता यामहत्वपूर्ण क्षेत्रात काम करणाऱ्या मुखेड शहर व तालुक्यातील सर्व वार्ताहर बंधू, विविध वृतमानपत्राच्या प्रतिनिधींचा राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून वार्ताहरांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे दि. ७ नोव्हेंबर रोजी आयोजन करुन मुखेड तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने शाल, गुलाबपुष्प व लेखणी नांदेड जिल्हाकृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, डफ महाराज नागपूरकर, तालुका कृषीधिकारी विकास नारनाळीकर यांच्या हस्ते भेट देवुन यथोचित सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजत करण्यात आलेल्या वार्ताहार सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नादेड जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डफ महाराज नागपूरकर, तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर, जेष्ठ पत्रकार यशवंतराव बोडके, पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी कोनापुरे, जयभिम सोनकांबळे, शेखर पाटील, बाबुराव वाघमारे, संदीप पिल्लेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कृषी अधिकारी विकास नारनाळीकर यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार सहाय्यक कृषी अधिकारी संभाजी गिरी यांनी मानले. यावेळी मंडल कृषी अधिकारी किरण गंभीरे, संजय फुलारी, कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष संतोष दवडे, कृषि सहाय्यक सुनिल बनसोडे, दिगांबर शेट्वाड, शितल विजापूर, निकिता शिर्से, आश्विनी काळे, ललिता वरतले, भालेकर दयानंद, सुनिल श्रंगारे, संतोष दबडे, समुद्रपती तिकटे, वाचने हरीश, शिंदे माधव, भोसले पंकज, सुजित सोनकांबळे, साईनाथ कचकळवार, मध्येवड नागोराव, सुरेश येलेवड, गुट्टे तिरुपती, माधव सोनटक्के सह तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, सर्व कृषी सहाय्यक, सर्व पत्रकार संघाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.



