सामाजिक

मिशन उडान; घेतलेला निर्णय आणि केलेली घोषणा पूर्णत्वास नेणारे व्यक्तीमत्व:- अबीनाश कुमार

नांदेड प्रतिनिधी:- 

विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शना खाली नांदेड चे पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार  अप्पर पोलिस अधिक्षक सुरज सुरव यांच्या सकल्पनेतून जिल्हा पोलिस दलाने राबविलेल्या मिशन उडान अंतर्गत रोजगार मेळाव्याला अभूतपूर्व असे यश मिळालेनऊ हजार जणांनी नोंदणी केलेल्या या मेळाव्यात देशभरातील नामांकित ९७ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होतेदिवसभरया कंपन्यांनी तब्बल  हजार ५०२ युवकांना नोकरीचे नियुक्तीपत्र दिले आहेनियुक्तीपत्र हातात पडताचया बेरोजगार युवकांच्या चेहऱ्यावरील आनंद मावेनासा झाला होता

अबीनाश कुमार यांनी नवा इतिहास घडवीला आणि राजकारण्यांना एक प्रकारे धडाच शिकवीला.

त्यांनी नांदेड मध्ये जनहितवादी अनेक वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले आहेत

नांदेडच्या गल्लीबोळातून गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला हद्दपार करणारे पोलीस अधीक्षक अबीनाश कुमारयांनी ‘मिशन उडान‘ च्याअगोदर ‘मिशन फ्लॅश आऊट‘ च्या माध्यमातून भल्याभल्याना धूळ चारली.

त्यांच्या या धडाकेबाज कारवाईने  राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आणि सामान्य जनतेला न्यायाचीआशा निर्माण झाली.गुन्हेगारी  भ्रष्टाचाराला आळा घालून त्यांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थाअबाधित ठेवण्याचा नेहमीच कसोशिने प्रयत्न केला.

नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि प्रेमाने  विश्वासाने काम करून घेण्याची  कार्यपद्धत सर्वांनाचआवडणारी आहे मे २०२५ रोजी त्यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस कवायत मैदानयेथे ‘मिशन उडान‘ या लक्षवेधी अभियाना अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा याउद्देशाने भव्य बेरोजगार मेळावा घेतला.या मेळाव्यात साधारणतः ११ हजार सुशिक्षित बेरोजगारांनारोजगार मिळेल असे नियोजन केले.वेगवेगळ्या नामांकित कंपण्यांना आमंत्रित केले आणि पहिल्यासत्रात  हजार ५०० बेरोजगारांना नोकरी मिळाल्याचे नियुक्ती पत्र दिले.

नोकरीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद खूपच आशादायी होता.

खरे पाहिले तर असे उपक्रम राबविण्याची जबाबदारी ही राजकीय किंवा सत्ताधारी मंडळीची असतेकिंबहुना सरकारची असते परंतु राजकारण्यांच्या नाकावर टिचून  अबीनाश कुमार यांनी नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन उडान अभियान यशस्वीकरून स्थानिक राजकारण्यांना डाऊन केले आहे.खऱ्या अर्थाने हा नांदेड पॅटर्न देशभर राबविण्याची गरज आहे.

सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोत्यामुळे अशा बेरोजगार युवकांसाठी पोलिस दलाच्या वतीने शुक्रवारी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

मेळाव्याच्या उद्घाटनाला खासदार डॉअजित गोपछडेआमदार हेमंत पाटीलआमदार आनंद बोंढारकरहे उपस्थित होतेसकाळपासूनच मेळाव्यासाठी बेरोजगार तरुणांचे लोंढे मुख्यालयाच्या मैदानावर दाखलहोत होतेत्यांना ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button