क्राईम

अवैध रेती माफियांवर पोलिसांची कारवाई: ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पण ‘ही’ कारवाई फक्त एका दिवसापुरतीच का?

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- ०९ ऑगस्ट २६ 

मुखेड पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका हायवा टिप्परवर धडक कारवाईकरत तब्बल ४० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेमात्रया कारवाईनंतर पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “त्या दिवशी संपूर्ण तालुक्यात केवळ एकच गाडी रेतीची वाहतूक करत होती का?” असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहेरात्रंदिवस राजरोसपणे सुरू असलेल्या असंख्य अवैध टिप्परकडे डोळेझाक करून केवळ एका दिवसापुरती केलेली ही कारवाई म्हणजे निव्वळ धूळफेक तर नाही नाअशी चर्चा आता रंगू लागली आहे.

सविस्तर वृत्त असे कीनांदेडचे पोलीस अधीक्षक माडॉनीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहेयाच मोहिमेअंतर्गत दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ रोजी नरसी ते मुखेड जाणाऱ्या रोडवर एका हायवा टिप्परमधून (क्र. MH-04-JU-0486) अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होतीत्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सदर वाहन अडवले आणि पाहणी केली असतात्यामध्ये पाच ब्रास रेती आढळून आलीचालकाकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही रॉयल्टी अथवा वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झालेयाप्रकरणी चौकशी केली असताचालकाचे नाव उद्धव रामचंद्र भरकडे (वय ३०तर वाहन मालकाचे नाव कृष्णाजी दशरथ भरकडे (दोघेही राकौडगावतालोहाजिनांदेडअसल्याचे समोर आलेपोलिसांनी धडक कारवाई करत ४० लाख रुपये किमतीचा हायवा आणि २५ हजार रुपये किमतीची ब्रास रेती असा एकूण ४०,२५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेयाप्रकरणी चालक  मालक यांच्या विरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गु..नं२४५/२०२६ नुसार कलम ३०३() BNS सह कलम ४८(), ४८(जमीन महसूल अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई देगलूरचे पोलीस उप अधीक्षक किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाडपोलीस उपनिरीक्षक संदीप यामावार आणि अंमलदार यादव इबितवारधम्मा सोनकांबळेरविंद्र भुलेसुरज गाजलवाड यांनी यशस्वीरित्या पार पाडलीपोलिसांच्या या कारवाईचे एकीकडे कौतुक होत असले तरीदुसरीकडे जनतेमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहेमुखेड आणि परिसरातून रात्रंदिवस अवैध रेतीचे शेकडो टिप्पर राजरोसपणे धावत असतातमग एरवी हे बेकायदेशीर वाहतूक करणारे टिप्पर पोलिसांना का दिसत नाहीतहा खरा प्रश्न आहेरोज शेकडो ब्रास रेतीची चोरी होत असताना आणि माफिया मोकाट फिरत असताना केवळ एकाच गाडीवर कारवाई करून प्रशासन नेमके काय साध्य करू पाहत आहेकेवळ वरिष्ठांना दाखवण्यासाठी एका दिवसाचा फार्स करण्यापेक्षारात्रंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या  शासनाचा महसूल बुडवणाऱ्या सर्वच अवैध रेतीमाफियांच्या कायमस्वरूपी मुसक्या पोलिसांनी आवळाव्यातअशी संतप्त आणि रास्त अपेक्षा आता जनतेतून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button