महानगरपालिकेची कर वसुलीसाठी धडक मोहिम सुरु

आजच्या कार्यवाहीत दोन दुकान सिल, तीन नळ व एक ड्रेनेज खंडीत, एक मोकळा भुखंड जप्त
नांदेड प्रतिनिधी:- – महानगरपालिका मा. आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, मा. अति. आयुक्त गिरीश कदम, मा. उपायुक्त (कर/महसुल) डॉ. पंजाब खानसोळे यांच्या नियंत्रणाखाली आज 18 ऑक्टोंबर 2023 रोजी क्षेत्रीय कार्यालय क्र. 1 तरोडा अंतर्गत मालमत्ता पीन क्र.40201230005 जाधव उत्तमराव व ईतर यांच्या मालमत्तेवर रु.4लक्ष93हजार254/ कर थकीत असल्याने संबंधितांचे एक दिकान सिल करण्यात आले. क्षेत्रीय अधिकारी राजेशसिंह चौहाण पथकातील संतोष जिंतुरकर, विठ्ठल तिडके, साहेबराव ढगे, नागेश ऐकाळे, अजरोद्दीन, कपील कांबळे, कृष्णा पाथरकर यांनी सहभाग नोंदविला
क्षेत्रीय कार्यालय क्र.2 अशोकनगर अंतर्गत मालमत्ता क्र.1-19-288 या मालमत्तेवर रु. 96हजार302/ कर थकीत असल्याने सदर मातमत्तेचा नळ खंडीत करण्यात आला. क्षेत्रीय अधिकारी डॉ. मिर्झा फरतुल्लाह बेग पथकातील वसंत कल्याणकर, परसराम गाढे, रणजीत पाटील. आदींनी ही कारवाई पार पाडली.
क्षेत्रीय कार्यालय क्र. 4 वजीराबाद अंतर्गत मालमत्ता क्र.3-1-110 कांतीबेन कांतीलाल लोटीया यांच्या मालमत्तेवर 5लक्ष 30 हजार 330 / कर थकीत असल्याने संबंधिताचे ड्रेनेज खंडीत करण्यात आले. तसेच मालमत्ता क्र. 3-1-403 रामा गणपती मोतेवार यांच्या मालमत्तेवर रु 1लक्ष70 हजार819/ कर थकीत असल्याने संबंधिताचे दुकान सिल करण्यात आले. मालमत्ता क्र. 3-2-311 पांडुरंग माधवराव गलपवाड यांच्या मालमत्तेवर 1लक्ष56हजार 128/ कर थकीत असल्याने संबंधिताचे दोन नळ खंडित करण्यात आले. क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव पथकातील गौतम कवडे, अजहर अली आदींनी सहभाग नोंदविला.
क्षेत्रीय कार्यालय क्र.6 सिडको अंतर्गत मालमत्ता क्र.4061002711 या मालमत्तेवर रु 54 हजार 507 / कर थकीत असल्याने संबंधिताचा मोकळा भुखंड जप्त करण्यात आला. अधिकारी संभाजी कास्टेवाड पथकातील सुधीरसिंह बैस, मालु एनफळे, मारुती सारंग कारवाईत सहभाग नोंदविला. क्षेत्रीय आदीनी
महानगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांनी आपला चालु व थकीत कर भरणा करुन महापालिकेस सहकार्य करावे. तसेच मालमत्ता कर व थकबाकीवरील 50 टक्के शास्ती माफी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहान उपायुक्त (महसुल) डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले आहे.



