प्रदेश सरचिटणीस डॉ. श्रावण रॅपनवाड यांची औसा विधानसभा प्रभारीपदी निवड

मुखेड प्रतिनिधी:- १० सप्टेंबर
काँग्रेस प्रदेश सरचिटणीस भारत यात्री डॉ. श्रावण रॅपनवाड यांची औसा विधानसभा प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे या नियुक्ती बदल सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने वरिष्ठ उपाध्यक्ष (प्रशासन) गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने राज्यातील विविध विधानसभा क्षेत्रांसाठी प्रदेश पदाधिकाऱ्यांची प्रभारी पदावर नियुक्ती जाहीर केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा राहुल गांधी यांच्या सोबत भारत जोडो यात्रा मध्ये ५ महिने राहून ४०८० किलोमीटर पदयात्रा केलेले डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी प्रदेश कमिटीतील वरिष्ठांना अवघडात अवघड विधानसभा क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्यांना औसा विधानसभा प्रभारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे. डॉ. रॅपनवाड यापूर्वी उस्मानाबाद आणि हिंगोली चे सहप्रभारी म्हणून काम पाहिले आहे. प्रदेशाकडून वरिष्ठ उपाध्यक्ष (प्रशासन) गणेश पाटील यांनी लातूर जिल्हा प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा प्रभारी जाहीर केले आहेत. प्रदेश सरचिटणीस डॉ. श्रावण रॅपनवाड यांच्या औसा विधानसभा प्रभारी पदावर निवडी बद्दल माजी मंत्री अमितभैया देशमुख, लातूर जिल्हाध्यक्ष अभय पाटील साळुंखे, माणिकराव हुलगुंडे, शिवशंकर बोपचंदे, संजय लोंढे, आदित्य माने, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे, नांदेड जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, नांदेड कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, दीपक सिंग हुजूरिया, संजय वाघमारे, गगनयादव, यशपाल सावंत, माधव पवळे, अनिल पाटील चिमेगावकर, अजिज कुरेशी आदींसह औसा, नांदेडव लातूर जिल्ह्यातील अनेकांनी केले आहे.


