Uncategorized

पुणे विद्यापीठात एसएफआयच्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणार्‍या अभाविपच्या गुंडांना अटक करा

एसएफआय संघटनेचे महात्मा फुले पुतळ्यासमोर निदर्शने

नांदेड प्रतिनिधी:- शैक्षणिक वातावरण बिघडवणार्‍या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या संघटनेवर शैक्षणिक कँम्पसमध्ये तात्काळ बंदी घालून पुणे विद्यापीठात एसएफआयच्या कार्यकर्त्यांवर जीव घेणा हल्ला करणार्‍या अभाविपच्या गुंडाना तात्काळ अटक करवी, यामागणीसाठी ३ नोव्हेंबर रोजी शहरातील आयटीआय चौकतील महात्मा फुले पुतळा परिसरात एसएफआय संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. पुणे विद्यापीठात झालेल्या मारहाणीचे पडसाद आता नांदेड मध्ये सुद्धा पहावयाला मिळत आहेत. शुक्रवरी निदर्शने करून जिल्हाधिकार्‍या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले.

१ नोव्हेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआयची) सभासद नोंदणी सुरू असताना यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)च्या जातीवादी गुंडांनी अचानक येवून एसएफआयच्या कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात एसएफआयचे राज्य अध्यक्ष आणि केंद्रीय कमिटी सदस्य सोमनाथ निर्मळ, शहर सचिव अभिषेक शिंदे, गणेश जानकर या कार्यकर्त्यांनवर जीव घेणा हल्ला करण्यात आला. मुलींना देखील मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात इतरही एसएफआयचे कार्यकर्ते जख्मी झाले आहेत. या हल्ल्याचा नांदेड एसएफआय विद्यार्थी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कायम असे हिंसक कृत्य करत आली आहे. त्यांनी त्यांच्या गुंड संस्कृतीची पुनरावृत्ती केली आहे. काहीही कारण नसताना, शांततेत एसएफआयची सभासद नोंदणी सुरु असताना हा हल्ला केला गेला. अचानक एसएफआयच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. हे एकदा नाही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. प्रत्येक कँम्पसमध्ये विद्यापीठात यांची गुंडागर्दी सुरू झाली आहे. एसएफआयच्या कार्यकर्त्यांनावर जीव घेणा भ्याड हल्ला करणार्‍या गुंडांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही दिला आहे. या आंदोलनात एसएफआय संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ.विजय लोहबंदे, कॉ.स्वप्नील बुकत्तरे, कॉ.मीना आरसे, कॉ. प्रफुल कऊटकर, शेतमजूर युनियनचे कॉ.विनोंद गोविंदवार, कॉ.मंजूश्री कबाडे, रोहित त्रिभवन, प्रथम तारू, शैलेज जाधव, प्रतिक्षा भीसे, प्रतिक्षा कंधारे, अनिकेत धुतराज, जयराज जाधव, विनित नरवाडे यांच्यासह असंख्ये विद्यार्थी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button