ड्रेनेजचा पाणी राज्य महामार्गावर; मोठी रोगराई पसरण्याची शक्यता !

मुखेड/प्रितिनधी :
शहरातील बारहळी नाका येथील मुख्य ड्रेनेजचा पाणी थेट राज्य महामार्गावर येत असल्याने सकाळी जॉगिंगसाठी ये जा करणाऱ्या व स्थानिक नागरीकांना याचा नाहक त्रास होताना दिसत आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून ड्रेनेज तुडुंब भरली असून ड्रेनेज घाण पाणी रस्त्यावरुण वाहत आहे. या ड्रेनेजचे पाणी बारहळी नाका ते नारायणप्रभा बाळ रुग्णालय ते गोदावरी हाँिस्पटल ते शहरालगत असलेल्यानदीला जाऊन पोहचत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रेनेज घाण पाणी जात असताना नगर पालिका लक्षका देत नाही ? असा सवाल सुज्ञ नागिरक विचारत आहेत.
तर एकीकडे डॉ हिमगिरे, युवा नेते बोनलेवाड, महावीर शिवपूजे, तालुक्यातील दिग्गज गुत्तेदार अंगद मैलारे, ज्येष्ठ नेते व्यापारी पत्तेवार सावकार यांच्या घरासमोरून अतिशय घाण पाणी वाहत असताना देखील नेत्यांन कडून कसल्याच प्रकारचे उपाय करण्यात आलेल नसल्याचे दिसून येत आहे
स्वच्छतेवर दरमहा लाखो रुपये खर्च करूनही महामार्गावर एवढी घाण नागिरकांना पाहायला मिळत असल्याने नागिरकांतून आश्रचर्य व्यक्त केल्या जात आहे. अशा पिरिस्थतीत शहरात मोठी रोगराईपसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी स्वच्छता करावी अशी मागणी नागिरकांन कडून केली जात आहे.



