मुखेड येथे आमदार चषक क्रिकेटचे आयोजन; अनेक दिगज खेळाडू होणार दाखल

मुखेड प्रतिनिधी:- आसद बल्खी
■ फिस अंतिम तारीख १४.११.२०२३
■ सामने हे १५ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार
■ लाईव्ह प्रक्षेपण या संपूर्ण सामन्यांचे युटुयूबवर लाईव्ह प्रसारण होणार
मुखेड येथे आमदार तुषार राठोड मित्र परिवार व सोमनाथ बंडे मित्र परिवार यांच्या संकल्पनेतुन आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा चषक 15 नोव्हेंबर पासून जिल्हा परिषद हायस्कुल (मुलींचे), मैदान मुखेड येथे सुरू होत २८ नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे. ही सामने खुले व टेनिस बॉलने खेळविले जाणार आहे.
प्रथम बक्षीस मुखेड कंधार मतदार संघाचे आमदार तुषार राठोड यांच्या तर्फे १ लाख ५१ हजार रुपये,तर दुसरे बक्षीस १ लाख १ हजार रुपये सय्यद एफ.एम याच्या वतीने तर तिसरे बक्षीस ६६ हजार ६६६ रुपये मिलिंद लोहबंदे, चतुर्थ बक्षीस ३३ हजार ३३३ रुपये आकाश दरेगावे तर उत्कृष्ट संघ म्हणून २२ हजार २२२ रुपये बजरंग कल्याणी यांच्या तर्फे तर मॅन ऑफ द सिरीज १५ हजार रुपये बाबु बागवान तर्फे ,मॅन ऑफ द मॅच ८ हजार ८८८ रुपये जायका बिर्याणी हाऊस तर्फे तर ऑरेंज कैप ५ हजार ५५५ रुपये राजु गजलवाड तर्फे, पर्पल कैप ५ हजार ५५५ रुपये नागेश गोविंदवाड तर्फे,सर्वाधीक घटकार ४ हजार ४४४ रूपये गजु लोखंडे यांच्या तर्फे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ३ हजार ३३३ रुपये . संदिप वी. ढगे यांच्या तर्फे, उत्कृष्ट यष्टीरक्षक २ हजार २२२ रुपये विकास कासले तर्फे, अत्कृष्ट सोळाडू १ हजार १११ रुपये धनंजय मुखेडकर यांच्या तर्फे बक्षीसे देण्यात येणार आहे
या सामन्यात प्रवेश घेण्याची फी २ हजार रुपये समिती ने ठेवली आहे.
लाईव्ह प्रक्षेपण या संपूर्ण सामन्यांचे युटुयूबवर लाईव्ह प्रसारण होणार आहे. तसेच खेळले गेलेले प्रत्येक सामने युट्यूबवर पब्लिश केले जाणार आहेत. ज्यामुळे प्रत्येक खेळाळू व क्रीडाप्रेमी रसिकांना घरबसल्या सामने बघता येणार आहेत. क्रिकेट सामन्याचे उदघाटन १५ नोव्हेंबर रोजी मुखेड कंधार मतदार संघाचे आमदार तुषार राठोड व इतर मान्यवरांच्या यांच्या हस्ते होणार आहे
संवेदनशिल क्रिकेटर बाबु सर गंदपवाड, दयानंद परपुरवाड
अंपायर्स : चंद्रकांत गुडमेवाड, शाकीर शेख, जनार्धन सोनकांबळे, हरून शेख कॉमेंटेटर : मुजीब धुंदी, शेख ईस्माईल शेख मौला, सुधीर एकाळे स्कोरर आशिष अग्रवाल, राहूल पाटील राहणार आहेत
या खुल्या सामन्यांमध्ये जास्तीत जास्त क्रिकेट प्रेमींनी आपल्या चमू सह सहभाग नोंदवावा व अधिक माहिती साठी : सोमनाथ बड़े मो. ९९२२७१६४६४ रिजवान कंधारकर मो. ७७०९३०९९७५ गजानन पाटील मो. ७०२८६९३०९५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजन समितीचे यांनी केले आहे.
नियम व अटी
* एक खेळाडु एका संघाकडुनच खेळेल.
* सर्व सामने 6, 8, 10 षटकांचे राहतील.
* पंचाचा निर्णय अंतीम राहील.
* थ्रो बॉलर चालणार नाही.
* प्रत्येक खेळाडुंची जीवीतांची हानी स्वतःची राहील.
* स्पर्धेचे सर्व अधिकार आयोजकांकडे राहतील.
* बॉल आयोजकांकडून देण्यात येईल.
* इंट्री फीस 50% अॅडव्हान्स दिली तरच टीम ग्राह्य धरल्या जाईल



