Uncategorized

पूर्ववैमनस्यातून खून का बदला खून विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली घटना

नांदेड प्रतिनिधी

शहरातील एमजीएम कॉलेज परिसरामध्ये भावाच्या खुनाचा बदला घेण्याच्या हेतूने खून का बदला खून म्हणून एका जणांनी दुसऱ्यावर वार करून खून केल्याची घटना नुकतीच विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये घडली आहे
सविस्तर वर्तन असे की विश्वास शिंदे यांचा भाऊ सचिन शिंदे यांचा दिलीप पवार ने काही दिवसापूर्वी परळी येथे नेऊन खून करून प्रेत जंगलामध्ये मध्ये फेकून दिले होते याच बदला घेण्यासाठी विश्वास शिंदे यांनी आज रोजी एमजीएम परिसरामध्ये राहत असलेला दिलीप पवार याला गाठून माझ्या भावाचा खून करून प्रेत जंगलामध्ये फेकले होतेस काय असे म्हणून त्याचा खून केला व खून का बदला खून करून घेतला असल्याची घटना नुकतीच घडली आहे या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून घटनातळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे फोज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले असून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात पाठवून दिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विमानतळ हे करीत आहेत या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गुन्हेगारावर पोलिसांची वचक राहिली नाही दररोज खून माऱ्यामाऱ्या दरोडे हे प्रकार घडत असून शहरात गावठी पिस्तल तलवारी यांच्या सुळसुळाट झाला आहे यावर पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी सामान्य नागरिकांतून होताना दिसत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button