Uncategorized

उपविभागीय अधिकारी मंडलिक यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात बसपाचे बेमुद्दत सत्याग्रह आंदोलन

कंधार – लोहा तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खननाची चौकशा करून कारवाईची मागणी

नांदेड ( प्रतिनिधी ) :- कंधार येथील उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, या आणि अशा अनेक मागण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी मनिषभाऊ कावळे आणि प्रदेश महासचिव ॲड. परमेश्वर गोणारे यांच्या नेतृत्वाखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार ( दि.२१ ) पासून बेमुद्दत सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
यानिमित्ताने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कंधार- लोहा तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी संगनमत करून भ्रष्टाचार करणे, आदिवासी कोळी महादेव जमातीचे जाती प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत आर्थीक तडजोड करणाऱ्या व राजकीय आश्रय असणाऱ्या व्यक्तींना सुलभतेने जाती प्रमाणपत्र देणे आणि अन्य गोरगरीब लोकांचे प्रमाणपत्र जाणिवपुर्वक नाकारणे किंवा प्रलंबित ठेवून त्यांना मानसिक व आर्थीक त्रास देणे, मौजे जानापुरी ता.लोहा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 रूंदीकरणामध्ये कायम मालकी असणारी रहिवाशी घरे उठविण्या अगोदर मुल्यांकनाप्रमाणे त्यांना मावेजा मिळणे, कै. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर.वाकोडे यांना अपमानास्पद वागणूक देणारे खा.हेमंत पाटील यांना तात्काळ अटक करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील बहुचर्चित तांडा बार कायमस्वरूपी बंद करणे आणि कोट्यावधी रूपयांचा अन्यधान्य घोटाळा करूनही मोकाट फिरणारे बाबासाहेब सुतारे यांची मालमत्ता जप्त करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, आदि मागण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार दि. 21 नोव्हेंबर रोजी पासुन बेमुदत सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. तसेच उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार नाही, तो पर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. दरम्यान बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी मनिषभाऊ कावळे आणि प्रदेश महासचिव ॲड.परमेश्वर गोणारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या सत्याग्रह आंदोलनात बसपाच्या कोळी ज. भाईचाराचे जिल्हा महासचिव विठ्ठल अंबाजी कोठेवाड , लोहा – कंधार विधानसभा अध्यक्ष शिवराज दत्तराम कोठेवाड,लोहा – कंधार विधानसभा कोळी ज. भाईचाराचे उपाध्यक्ष नागोराव किशनराव गड्डमवार, हिंगोली लोकसभा आंध आदिवासी भाइचाराचे अध्यक्ष सखाराम वाकोडे, जिल्हाध्यक्ष रत्नाकर बुरकुले, महिला आघाडीच्या सरिता रमेश गवटी , अनिल पाईकराव, भास्कर कदम, माधव लोखंडे, गंगासागर नागोराव गोडबोले, सुमनबाई आदिसह बसपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button