Uncategorized

तुम्ही छगन भुजबळना पाडा, आम्ही तुमचे 160 उमेदवार पाडू……. माजी आ. शेंडगे

नांदेड /प्रतिनिधी: –

राज्यामधील ओबीसी समाजाला आरक्षणावर गदा आणण्यासाठी राजकीय खेळी करून मराठा समाज यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अनेक नेत्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. परंतु ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी समाज एकत्र झाला असून तुम्ही एक उमेदवार पाडला तर ,आम्ही तुमचे 160 उमेदवार पाडू अशी घणाघाती इशारा भटक्या विमुक्त जाती ओबीसी प्रवर्गाचे नेते माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी नांदेड येथील विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेत दिला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला प्रा. डीपी मुंडे प्राध्यापक लक्ष्मण गायकवाड मनोहर देवगुंडे डॉ. बी. डी चव्हाण एड. अविनाश भोसीकर आधी जणांची उपस्थिती होती . ते पुढे बोलताना म्हणाले की , ओबीसी समाजाचे आरक्षणावर हे लोक गदा आणण्याचा प्रयत्न करीत असून आता कुठे तर आमच्या समाजातील लोकांना थोडा बहु न्याय मिळत आहे. पंचायत समिती मेंबर जिल्हा परिषद काही आमदार खासदार होत आहे. आम्हाला हे संधी मिळाली नव्हती. आता आम्हाला आमचा आरक्षण मिळालेला आहे. त्यामुळे या आरक्षणावर गदा आणण्यासाठी मराठा समाज आक्रमण झालेला आहे .त्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण द्या .परंतु आमच्या मधून आरक्षण नको 50 टक्के च्या वर देऊन त्यांना आरक्षण द्या या मागणीला आमचे समर्थन आहे. काहीजणांनी छगन भुजबळ ना पाडण्याची मराठा समाजातील नेत्यांनी धमकी दिली आहे. जर तुम्ही एक मराठा समाजांनी आमच्या एकच भुजबळ ला पाडाल तर आम्ही तुमचे 160 मराठा समाजातील उमेदवार पाडू असा घनाघाती इशारा त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button