Uncategorized
भाटापुरच्या जि.प.शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.

विद्यार्थ्यांच्या बहारदार नृत्यांनी पालकांची मंने जिंकली.
मुखेड / प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्यांना यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून मुखेड तालुक्यातील मौजे भाटापुर प.मु.येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.१२ मार्च रोजी विद्यार्थ्यांचा गुणदर्शन व वार्षिक स्नेह संमेलन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकाहून सरस एक हिंदी व मराठी गीते, देशभक्तीपर गिते, दारूच्या दुष्परिणामाचे मूकनाट्य, कोळीगीते, लावणी,व्यसन मुक्तीवर नाटीका,विठ्ठल रुक्मिणी माऊली देखावा, पोवाडा,बेटी बचाव,बेटी पढाव नाटीका, रिमिक्स साँग, अंधश्रद्धा निर्मूलनवर आधारित नाटीका,समाजातील अनिष्ट सामाजिक रूढी पंरपंरेवर आधारीत विविध गितांवर नृत्य सादर करीत उपस्थित सर्व पालक तसेच गावकऱ्यांची मने जिकंली.
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजु पाटील रावणगावकर हे होते तर उदघाटक म्हणून तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे, प्रमुख अतिथी म्हणुन डोरनाळीचे सरपंच प्र.हुल्लाजी पाटील शिंदे, उपसरपंच प्र.प्रकाश पाटील शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मशरोद्दीन पटेल, जि.प.मुलींचे हायस्कूल मुखेड प्रशालेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पत्रकार महेताब शेख, शिक्षण विस्तार अधिकारी मलिकार्जुन शिरसले, विषयतज्ञ डाॅ.केरबा कांबळे, ग्रा.पं.सदस्य अशोकराव पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप खंडागळे, बालाजीराव पाटील, उपाध्यक्ष हणमंतराव वाघमारे, मुख्याध्यापक दत्ता सगर, अशोक भाकरे,विषय शिक्षक सिद्धेश्वर कोटे, एन.बी.रड्डी, शैलैष पाटील, सुभाष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.सदर कार्यक्रमाची सुरूवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षिका सौ.शोभा नल्लाबले यांनी केले तर प्रस्ताविक भाटापुर जि.प.शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख रवीकुमार कामन्ना यांनी केले.उपस्थितांचे आभार सहशिक्षिका अर्चना थोरे यांनी मानले.यावेळी भाटापुर व परिसरातील गावचे प्रतिष्ठित नागरिक,पालक, विद्यार्थी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहसमेंलनास तांत्रिक सहाय्य विषय शिक्षक सिद्धेश्वर कोटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक रवीकुमार कामन्ना, शिक्षिका अर्चना थोरे,मदतनीस राहुताई पाटील, संभाजी पाटील, राम पाटील यांनी परिश्रम घेतले.



