Uncategorized
मुस्लिम आरक्षण विषयी विचार विनिमय बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- महेताब शेख

मुखेड प्रतिनिधी:- सामाजिक दृष्ट्या मागासलेले असल्याने मुस्लिम समाजाला आरक्षणाची काळाची गरज आहे व ते त्यांना मिळायला हवे अशी शिफारस विविध घटनात्मक समित्यांद्वारे केली आहे. महाराष्ट्र सरकारने २०१४ साली दिलेले आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने देखिल वैध ठरविले आहे. असे असतानाही मुस्लिम समाजास आरक्षण का दिले जात नाही ? व ते कसे मिळवायला हवे? या विषयी विचार विनिमय करण्याची बैठक दि. १७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित केली आहे. नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी आयोजित मुस्लिम आरक्षण समिक्षा बैठकीला मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष महेताब शेख यांनी केले आहे.



