हनुमंतराव बेटमोगरेकर यांची नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड

▫️कार्यकर्त्यांनी शहरात फटाके फोडून पेढे वाटप करत आनंद केला व्यक्त
मुखेड प्रतिनिधी:- २४ जुलै २५
मुखेड– कंधार विधानसभेचे माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचेसंचालक हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांची एकमताने नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मुखेड तालुका काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचे स्वागत करून मुखेड शहरात फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भालचंद्र नाईक, महेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख उमेश पाटील अडलुरकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पाटील रावणगावकर, जिल्हा उपाध्यक्ष राजन देशपांडे, शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर , शौकत पठाण ,प्रकाश कानगुले, रामेश्वर पाटील इंगोले, शिवाजी गायकवाड, बालाजी वाडेकर, प्रकाश निमलवाड, सय्यद मुजीप, हाफीज पठाण, एम.आर. गोपणर, ईरफान मोमीन, संजय नुक्कुलवार, आकाश पाटील उन्द्रीकर आदींनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. दरम्यान, त्यांची निवड होताचफटाके फोडून‘ पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.




