शैक्षणिक

शिक्षकांनी आपल्या सेवा काळात सकारात्मकपणे कार्य करावे.-दिलीप बनसोडे

नांदेड:- शिक्षण क्षेत्रात अधुनिक संगणक युगात अमुलाग्र बदल घडत आहेत.ते बदल व तंत्रज्ञान अवगत करुन स्वत मध्ये बदल करणे,आवश्यक आहे.जे काम आपल्याला करावयाचे आहे,ते आनंदाने कामात आनंद घेत केल्यास,सकारात्मक विचाराने केल्यास अधिक उर्जा मिळते. वाजेगाव केंद्र हे शहरालगत असून हि या केंद्रात विविध शैक्षणिक उपक्रम प्रभाविपणे राबवली जातात.यामुळे या केंद्रात पटसंख्या टिकून आहे. याचे कारण येथिल शिक्षक हे शैक्षणिक गुणवत्ता वाढिसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.याच कार्याचा गौरव म्हणून आज शिक्षकांचा सन्मान केला जात आहे.हि शिक्षकांना प्रोत्साहन देणारी बाब आहे. असे मत शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांनी वाजेगाव केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत केले.यावेळी या विभागाचे शिक्षण विस्तार तथा शिक्षणाधिकारी मनपा व्यंकटेश चौधरी यांच्या संकल्पनेतून केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील उपक्रमशील आदर्श शिक्षकांचा सन्मान अक्षर परिवारच्या वतिने “शिक्षक भुषण” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
श्रीमती सविता सुधाकर पत्की सहशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडिपुयड, श्रीमती शाहिन बेगम अब्दुल रशिद सहशिक्षिका, जिल्हा परिषद केंदिय प्राथमिक शाळा वाजेगाव
सौ प्रणिता पारप्पा आकोशे सहशिक्षिका,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंजेगाव यांना सन्मानीत करण्यात आले.यावेळी शालेय पोषण अधिक्षक अवधुत गंजेवार,केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे, मुख्याध्यापक फरहत बानो,पंढरीनाथ टापरे,सायलू मंकोड,माधव कल्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर सुलभक अक्षय ढोके हकेथान ,अध्ययनस्तर याविषयी व सारंग स्वामी यांनी असाक्षर ,वेध शिक्षण ,शाळा बाह्य विद्यार्थी या विषयी संवाद साधत विषयावर चर्चा केली.तर युडायस प्लस, आपार आयडी, संच मान्यता,विविध शिष्यवृत्ती परिक्षा यावर सखोल मार्गदर्शन केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी केले.
शैक्षणिक वातावरणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फत्तेपूर येथील मुख्याध्यापक रंगनाथ सोनटक्के, सौ अनिता कल्याणकर, श्रीमती सुनिता मजरे, सतिष कोरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ मोहिनी संगेकर,उपसरपंच मोतीराम संगेकर,संभाजी देटवे,माधव विभुते,किशन देटवे संजय संगेकर,बालाजी वर्ताळे,व्यंकट संगेकर,महेश बंडाळे,शंकर टोकलवाड या पालकांची उपस्थिती होती तर सुत्रसंचालन श्रीमती वर्षा पटणे,आभार गजानन बुळगुंडे मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button