अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा मुखेड पोलिसांनी पकडला

चालक, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुखेड (प्रतिनिधी) :-
एका हायवा ट्रकमधून विनापरवाना लाल वाळूची वाहतूक सुरू असताना २३ डिसेंबर रोजी मुखेडपोलिसांनी ती हायवा ट्रक पकडून कारवाई केली. जाहूर चौकात ही हायवा पकडली. या कारवाईत ९ ब्रासवाळूसह पोलिसांनी २० लाखांचा हायवा ट्रकही जप्त केला आहे. चालक आणि मालक या दोघांविरुद्धहीगुन्हा दाखल केला आहे.
मुखेड ठाणे येथे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती मिळाल्यानंतर मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीसनिरीक्षक लक्ष्मण केंद्रे, अंमलदार प्रदीप शिंदे हे २३ डिसेंबर रोजी जाहूर चौकात पोहोचले. त्यावेळी सकाळीसव्वाआठ वाजेदरम्यान देगलूर रस्त्यावरून एक हायवा ट्रक विनापरवाना लाल वाळूची चोरटी वाहतूककरीत असल्याचे आढळले. दोन पंचांना बोलावून या छाप्याबाबत माहिती दिली. सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी लाल वाळू भरून येत असलेला हायवा ट्रक थांबवला. या हायवा चालकाकडे वाळू वाहतुकीच्यापरवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले.
यातील हायवा चालक आकाश सोपान वाघमारे रा. राजुरा ता. मुखेड आणि मालक मारुती पुंडलिकजंगमवाड रा. राजुरा, ता. मुखेड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकअबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्यामार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.



