क्रीडा

रस्ता ओलंडणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर दुचाकी धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मुखेड प्रतिनिधी 

चांडोळा गावा पासून दोन कि.मी अंतरावर तळ्यातून माती घेऊन येणारा ट्रॅक्टर आणि दुचाकीची धडक होऊनभीषण अपघात झाला. या धडकेत एक जागेवर ठार झाला. तर इतर दोघांना डोक्यात जबर मार लागलाअसून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे. ही घटना दि. ९ एप्रिल रोजी सकाळी८.३० च्या दरम्यान झाली आहे.

धनज गावातील मारोती राजेश घोडके (१७), मनीष राम वल्लेमवाड (१८), विवेक संतोष मानेकर (२०) हे तिघे आज सकाळी एमएससीआयटी संगणक कोर्ससाठी दुचाकीवरुन (क्र एम एच २६ X २५८६) मुखेडकडे येत होते. चांडोळा गावा जवळील तलावातून काळी माती घेऊन एक ट्रॅक्टर (क्र एम एच २६ बी एक्स ३२७८) अचानक मुख्य रस्त्यावर आला. त्यामुळे दुचाकीची व ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. यात मनीष उर्फ मनोजराम वल्लेमवाड याचा डोक्याला गंभीर मार लागल्याने जागेवरच मृत्यू झाला. तर मारोती घोडके याचा डावाहात फॅक्चर असून डोक्यात गंभीर दुखापत आहे. तसेच विवेक मानेकर यास डोक्यात गंभीर दुखापत झालीआहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर दोघांना डॉ. प्रकाश ठक्करवाड यांनी अधिक उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button