मुख्य निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांची निवडणूक विभागास भेट

विविध कक्षाच्या प्रमुखांची बैठक, कार्याचा घेतला आढावा
मुखेड / प्रतिनिधी
मुख्य निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी दि.१९ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड ९१ विधानसभा मतदारसंघातील तहसील कार्यालयतील निवडणूक विभागास भेट देवून निवडणूक कामी स्थापन करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कक्षाची पाहणी केली. कक्षप्रमुखांची बैठक घेतली. निवडणूक कायार्चा आढावा घेतला. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम व तहसिलदार राजेश जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या वेगवेगळया कक्षास मुख्य निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी भेट देऊन सर्व कक्ष प्रमुखांची बैठक घेतली. कक्षामार्फत होणाऱ्या कार्याची माहिती घेतली. यावेळी खर्च पथक, १ खिडकी, कर्मचारी नियुक्ती पत्र, मिडिया कक्ष व इतर कक्षाचे कक्ष प्रमुख व सहायक बैठकीस उपस्थित होते.
बैठकीपूर्वी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कुलदीप जंगम यांनी ९१ मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक पार पडण्यासाठी कशा प्रकारे नियोजन करण्यात आले याबाबत चलचित्रद्वारे माहिती दिली आहे त्यानंतर मुख्य निवडणूक निरीक्षक मिश्र यांनी ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. इनकोर प्रणालीद्वारे देण्यात येणाऱ्या विविध परवान्या बाबतची पाहणी केली. मार्गदर्शक सूचना केल्या. तसेच इतर पथकातील पथक प्रमुख यांना निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी तहसीलदार राजेश जाधव निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अशोक लबडे, नायब तहसीलदार नंदकिशोर भोसीकर, नायब तहसीलदार पांडुरंग गंगनर, निवडणूक विभागाचे महसूल सहाय्यक संदीप भुरे, महसूल सहाय्यक प्रशांत लिंबेकर, तलाठी गोपीनाथ कल्याणकर, सुनील कुलकर्णी, गुलाब शेख, एन. एस. होनराव, राजू सुवर्णकार, एम. डी. बदेवाड, मीडिया कक्षाचे पथक प्रमुख यू. एम. नारलावार, एस. जी. कुच्चेवाड, एस. डी. येनुरवार, रफिक करीम बागवान उपस्थित होते. दि. १८ व १९ रोजी दिव्यांग व ८५ वर्ष वयावरील मतदारांचे गृह मतदान झाले. यात एकूण २०७ मतदान झाले. यामध्ये २०२ मतदान हे ८५ वर्ष वयावरील मतदारांनी केले तर अपंग ०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गृह मतदानाची टक्केवारी ८७.९४ इतकी आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.



