क्राईम

मुखेड तालुक्यात गुटखा विक्री जोमात…

मुखेड प्रतिनिधी:- 

शहरासह ग्रामीण परिसरात प्रत्येक खेड्यात गल्ली बोळातील किराणा दुकान व इत्यादी ठिकाणी गुटख्याच्या पुड्या सरास विक्री होतांना दिसून येत आहेकोणाचीही भीती  बाळगता गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे.

 होलसेल गुटका विक्रेते हे सर्व खेड्यात  गावात प्रत्येक दुकानावर गुटख्याचा माल मोटारसायकल वरून पोहोचून देण्याचे काम करीत असल्याचे चित्र आहेमात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसून येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.युवक पुरुष तथा शालेय विद्यार्थीसुद्धा मोठ्या प्रमाणात यागुटख्याच्या आहारी गेले आहेतकर्करोगाचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने धाडसी निर्णय घेतराज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेतला होताकठोर अंमलबजावणीसाठी कायदासुद्धा निर्माण केला आहेपरंतु अन्न  औषध प्रशासन विभाग आणि पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसत आहेदुर्लक्षामुळे गुटखा विक्री जोमात सुरू आहेकारवाईत गुटख्याच्या पुड्या जप्त करण्यात आल्याचे दिसतअसले तरी थातूरमातूर कारवाई नंतर पुन्हा गुटखा विक्रीकडे दुर्लक्ष होत आहे.

शहरात पानटपऱ्यांवर गुटखा विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती त्या कार्यवाही नंतर काही महिने गुटखा विक्री बंद करण्यात आल होत नंतर गल्ली बोळातील किराणा दुकानावर लपुन चोरी ने विक्री केली जात आहे 

मात्र घाऊक विक्रेते मात्र मोकटच असून लाखोकरोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्यांवर कारवाई होणेआवश्यक आहे.

घाऊक विक्रेतेवर व किराणा दुकानदारावर अन्न  औषध प्रशासन विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्यावर कार्यवाही करणार का? हा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

काही भ्रष्ट अधिकारी –कर्मचाऱ्यांमुळे दुसऱ्या राज्यातुन गुटखा शहर  ग्रामीण भागात उपलब्ध होत आहेअसे असले तरी या अधिकारी  गुटखा तस्करी करणाऱ्यांमध्ये समेट घडवून आणणारे ते दलाल नेमके कोणते कोणत्या क्षेत्रातील ? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button