Uncategorized

नांदेडमध्ये रविवारी मोठी दुर्घटना! नगीना घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुरड्यांचा गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू!!

नांदेड प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ २४ मे २६

नांदेड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. साठे चौकपरिसरातील तीन मुले आज रविवार (२४ मे) संध्याकाळच्या सुमारास गोदावरी नदीच्या नगीना घाट येथे पोहण्यासाठी गेली होती. मात्र, नदीच्या पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही जण पाण्यातबुडू लागले. या दुर्दैवी अपघातात दोन निष्पाप चिमुरड्यांचा बुडून जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळेसाठे चौक आणि संपूर्ण नांदेड परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

मयत मुलांची नावे १. रणवीर यशवंत शिंगाडे (वय १४ वर्षे, रा. साठे चौक, नांदेड) २. गणेश डोंगरे (वय १३ वर्षे, रा. साठे चौक, नांदेड) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि वाढत्या उकाड्यामुळे साठे चौक परिसरातील तीन लहान मुले आज संध्याकाळी नगीना घाटयेथे पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेली होती. नदीच्या पात्रात उतरल्यानंतर पाण्याचा खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही मुले अचानक पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली आणि बुडू लागली. मुलांना बुडताना पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने धावघेतली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. या दुर्घटनेत रणवीर शिंगाडे आणि गणेश डोंगरे या दोन बालकांचा करुण अंत झाला.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहनदी बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी सध्या नांदेड येथील वजीराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दोन खेळत्या–बागत्या चिमुरड्यांचा असा अचानक नदीत बुडून मृत्यू झाल्याने मृतकांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.

उन्हाळ्याच्या दिवसांत मुले नदी, तलाव किंवा विहिरीवर पोहण्यासाठी जातात. मात्र पाण्याचा अंदाजनसणे अनेकांच्या जीवावर बेतत आहे. पालकांनी आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष ठेवावे आणित्यांना एकट्याला किंवा सुरक्षिततेच्या साधनांशिवाय पाण्यात जाण्यापासून रोखावे, जेणेकरून अशादुर्दैवी घटना टाळता येतील.

सदरील फोटो ही AI द्वारे बनवलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button