कंधार येथे मुस्लिम आरक्षण संदर्भात समिक्षा बैठक संपन्न.

कंधार:-
मुस्लिम समाजाच्या आरक्षण, शिक्षण व संरक्षण या विषयी चर्चेच्या माध्यमातून विचार विनिमय करण्यासाठी व हक्काच्या मागण्यांची पुढील दिशा ठरविण्यासाठी नांदेड जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर समाजबांधवाच्या समिक्षा बैठका घेण्यात येत आहेत त्यानुषंगाने कंधार येथे छोटी गल्ली अशुरखाना हॉल मध्ये “राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या” वतीने दि.२९ जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीस जेष्ठ संपादक अहेमद सानी, आब्दुल माजिद बशीर, डॉ.हकीम खान, मिर्झा नवाब बेग,मुख्तार आबेद, यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी आरक्षणाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी शेख हबबु भाई ,शेख सुलतान सर ,शेख रियझ सेठ ,मोलना मुराद सहाब,मन्नाचोधरी ,जफरखान साब,हमीदोदीन सर ,चांद सर ,अँड शहएबआज खान ,अँड जवीद ,अँड इम्रान ,हबीब भाई ,अहेमद पठाण मुखीद कुरेशी ,अतीख कुरेशी ,महेमुद पठान,सय्यद मगदुम ,मो अजीमोदिन नययरोदीन हैदर भाई ,मगदुम साहेब मुखेडचे आसद बलखी व विविध पक्षाचे नेते,कार्यकर्ते, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, युवा कार्यकर्ते बैठकीसाठी आलेले सकल मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते



