शहरात जि.प. च्या सीईओ मिनल करनवाल यांच्या प्रतिमेची प्रेत यात्रा जनआंदोलन करणार – शिवभगत

नांदेड – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल ह्या बेकायदेशीरपणे भूमाफीयांकडून मोठ्या प्रमाणात लाच घेऊन जनतेची लुट करणाऱ्यांना मदत करुन शासनाची व जनतेची फसवणूक करीत आहेत. हि फसवणूक थांबवावी यासाठी शहरात प्रेत यात्रा काढून जनआंदोलन करणार आणि या जनआंदोलनात कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास त्यास मिनल करनवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नांदेड ह्या जबाबदार राहतील असे प्रजासत्ताक समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज शिवभगत म्हणाले.
तालुक्यातील वाडी (बु) येथील सर्व्हे नं. २०९/ब या अर्धा एकर शेतात त्याचा एन.ए. लेआऊट केलेला नसतानाआम्रपाली दुधाळे गट नं. २०९/अ-३, शोभा कदम गट नं. २०९/अ-५, गौतम जमदाडे सर्व्हे नं.२०९/अ-३, राजू बुध्देवाड गट नं. २०९/ब या लोकांच्या जागेच्या कागदपत्राची, जागेची, एन.ए. लेआऊटची तपासणी न करता त्यांना त्यांच्या प्लॉटच्या जागा सोडून देऊन इतर ठिकाणी घरे बांधकाम करण्याची परवानगी दिली आहे. महसूली जागेवर बेकायदेशीरपणे त्यांचे प्लॉट नमुना नं. ८ ला लावून सरकारी जागा दाखविण्यात आली. असे २५० प्लॉट धारकांची फसवणूक वाडी (बु) येथे करण्यात आली. याबाबत माझ्या तक्रारीवरुन तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती गठीत करून चौकशी केली असता त्यांना २५० प्लॉट धारकांची फसवणूक झाली व नक शेतमालकांची फसवणूक झाल्याचा अहवाल चौकशी समितीने फेब्रुवारी २०२२ मध्ये सादर केला. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी अनेकांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल केले आहेत व वाडी (बु) येथील खरेदी-विक्रीवर बंदी घातली आहे. प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीने हा मुद्या विभागीय आयुक्त औरंगाबाद येथे नेऊन जुलै २०२२ मध्ये बेमुदत अमरण उपोषण चालू केले.
विभागीय आयुक्त यांच्या आदेशावरुन तत्कालीन ग्रामसेवक अमृत शिंदे, संजय कानोडे या ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांची चौकशी केली असता त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. त्यांचा जबाब खुलासा असमाधानकारक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नांदेड यांनी विभागीय आयुक्तांना १० ऑक्टोबर २०२२ रोजी लेखी पत्र देऊन कळविले आहे. विभागीय आयुक्त यांच्या २८ जुलै २०२२ रोजीच्या पत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नांदेड यांना आपण व्यक्तीगत लक्ष देऊन संबंधित ग्रामसेवका विरुध्द उपरोक्त बाबींच्या अनुषंगाने नियमाप्रमाणे कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ या कार्यालयास सादर करावा, असे आदेश दिलेले आहेत. विभागीय चौकशी करण्याच्या नावाखाली १० ऑगस्ट २०२२ पासून मागील १७ महिन्यापासून आयुक्तांच्या आदेशास केराची टोपली दाखवत मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.नांदेड हे मनमानी करीत आहेत. जनतेची लुट करणाऱ्यांना मदत करुन शासनाची व जनतेची फसवणूक करीत आहेत. सदरची मागणी २० फेब्रवारी पर्यंत मान्य न केल्यास २१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नांदेड यांच्या प्रतिमेची नांदेड शहरात प्रेत यात्रा काढून जनआंदोलन करणार आहोत. सदर जनआंदोलनात कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास त्यास मिनल करनवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नांदेड ह्या जबाबदार राहतील असेही प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज शिवभगत म्हणाले.



